मुंबई : एसटी महामंडळाच्या वातानुकूलित शिवशाही बसमध्ये आता दिव्यांग (अंध, अपंग व्यक्ती) आणि त्यांच्या साथीदारास प्रवासभाडे सवलत देण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. शिवशाही (आसन व्यवस्था) बसमध्ये आता दिव्यांग व्यक्तीस प्रवास भाड्यात ७० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या साथीदारास प्रवास भाड्यात ४५ टक्के इतकी सवलत देण्यात येणार आहे.
एसटी महामंडळाच्या वातानुकूलित #शिवशाही बसेसमध्ये प्रवासभाड्यात आता दिव्यांग (अंध, अपंग) व्यक्तीस ७० टक्के तर त्यांच्या साथीदारास मिळणार ४५ टक्के सवलत -परिवहनमंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांची घोषणा@DRaote @msrtc_in pic.twitter.com/6fEMApwuaE
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 6, 2019
महामंडळामार्फत अंध आणि अपंगांना साध्या आणि निमआराम बसमधून प्रवासासाठी ७५ टक्के सवलत देण्यात येते. याशिवाय त्यांच्या साथीदारास साध्या व निमआराम बसमधून प्रवासासाठी ५० टक्के सवलत देण्यात येते. आता या प्रवास भाडे सवलत योजनेत वातानुकूलित शिवशाही (आसन व्यवस्था) बसचाही समावेश करण्यात आला आहे. सध्या एसटी महामंडळाच्या अंध आणि अपंगांसाठी असलेल्या प्रवासभाडे सवलत योजनेचे राज्यभरात अंदाजे २ लाख ८२ हजार इतके लाभार्थी आहेत. आता त्यांना शिवशाही बसमधून प्रवासभाडे सवलत मिळणार असल्याने राज्य शासनावर अतिरिक्त बोजा पडणार आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/