ऑनलाईन रिटेल कंपन्यांची विक्री घटली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2019
Total Views |
 

नवी दिल्ली : ई-कॉमर्स क्षेत्रातील नव्या नियमांमुळे अॅमेझॉनने त्यांच्या सर्वात मोठा विक्रेत्या क्लाऊडटेलला पुन्हा वेबसाईटशी जोडले आहे. ऑनलाईन बाजारपेठेतील दिग्गज कंपनी अॅमेझॉनने यासाठी अंतर्गत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

 
केंद्र सरकारने १ फेब्रुवारीपासून ऑनलाईन रिटेल कंपन्यांच्या घसघशीत ऑफर्सवर नियंत्रण आणले आहे. नव्या नियमांमुळे फ्लिपकार्टला सुमारे २५ टक्के वस्तू वेबसाईटवरून हटवाव्या लागल्या आहेत. ऑनलाईन बाजारपेठेतील विक्रीत एकूणच २० ते २५ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर वस्तू उपलब्ध नसल्याचे वेबसाईटवर दिसत आहेत. असाच फटका अॅमेझॉनलाही बसला आहे. त्यामुळे यातून सावरण्यासाठी कंपनीने ही शक्कल लढवली आहे.
 

गुरुवारी क्लाऊडटेल आणि अॅमेझॉनने एकूण ३ लाख वस्तू विक्रीसाठी उपलब्ध केल्या. अॅमेझॉनने आपली ४९ टक्क्यांवरील अप्रत्यक्ष हिस्सेदारी घटवत २४ टक्क्यांवर आणली आहे. त्यानुसार अॅमेझॉनच्या वेबसाईटवर आता सर्वात जास्त हिस्सा हा कॅटामारन या कंपनीने खरेदी केला आहे.

 

अॅमेझॉनने दिलेल्या माहितीनुसार, आता या बाजारपेठेत कंपनीची कोणतिही थेट हिस्सा आहे. इन्फोसिसचे अध्यक्ष नारायण मूर्ती यांनी सुरू केलेल्या कॅटामारन या कंपनीने नव्या नियमांनुसार हे बदल केले आहेत. अॅमेझॉनने यापूर्वी चीनमधूनच असा काढता पाय घेतला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@