
बालाकोट येथे भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राईकनंतर भितरलेल्या पाकिस्तानच्या प्रति हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यानंतर सीमा भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. तर पाकिस्तानकडून रात्रभर गोळीबार चालू होता. यातच आज सकाळी पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. मात्र, भारतीय वायू दलाच्या चोख प्रतीउत्तरानंतर हे विमाने पळून गेली तर यातील एक विमान पाडण्यात भारताला यश आले आहे. दरम्यान, वायू दलाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
माहितीच्यामहापुरातरोजच्यारोजनेमकामजकूरमिळविण्यासाठीलाईककरा...facebook.com/MahaMTB/आणिफॉलो कराtwitter.com/MTarunBharat