सीमेवरील तणावातही शेअर बाजाराचा ‘जोश हाय’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2019
Total Views |


मुंबई : सीमेवरील एअर स्ट्राईकनंतर तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात बुधवारी जोरदार खरेदी दिसून आली. मात्र, अखेरच्या सत्रात गुंतवणूकदारांनी विक्री केल्याने दोन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स दिवसभरात सर्वाधिक पाचशे अंशांनी गडगडला. दिवसअखेर तो ६८.२८ अंशांनी कमजोर होऊन ३५ हजार ९०५.४३ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २८.६५ अंशांनी घसरून १० हजार ८०६ च्या स्तरावर बंद झाला. ऑटो आणि फार्मा कंपन्या वगळता सर्व शेअर घसरणीसह बंद झाले.

 

सेन्सेक्सच्या मंचावर भारती एअरटेल, बजाज ऑटो, एलएण्डटी, सन फार्मा, अॅक्सिस बॅंक आदी शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. निफ्टीमध्ये भारती इन्फ्राटेलची सर्वाधिक घसरण झाली. याशिवाय विप्रो, वेदांता, टाटा मोटार्स, टायटन आदी शेअर्समध्ये विक्री दिसून आली. अल्ट्राटेक सिमेंट, एलएण्डटी, बजाज ऑटो, सन फार्मा आदी शेअर वधारले.

 

दरम्यान बुधवारी सकाळी शेअर बाजारात जोरदार खरेदी दिसून आली होती. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ३६ हजार ३६७.१७ वर जाऊन पोहोचला होता. यावेळी आलेल्या भारतीय सीमारेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी नफावसुली सुरू केली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@