२०१५ मध्ये ग्रामीण विकास, शिक्षण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा विकास या क्षेत्रातील योगदानासाठी कन्याकुमारी येथील ‘विवेकानंद केंद्र’ या संस्थेला पुरस्कार देण्यात आला. या संस्थेद्वारे योगा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाते. अनेक शिबिरांचे आयोजन या संस्थेमार्फत करण्यात येते. तसेच ग्रामीण विकास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महाबलीपुरममध्ये या संस्थेने घन कचऱ्याचे व्यवस्थापन केले असून संस्थेद्वारे बायोगॅस संयंत्र तयार करण्यात आले. विवेकानंद केंद्र ही स्वामी विवेकानंदांच्या सिद्धांतावर आधारित असलेली एक आधात्मिक संस्था आहे. ७ जानेवारी १९७२ मध्ये कन्याकुमारी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक एकनाथ रानडे यांनी ‘विवेकानंद केंद्र’ या संस्थेची स्थापना केली होती. विवेकानंद केंद्र या संस्थेने पुरस्कारात मिळालेली १ कोटी रुपयांची बक्षिस रकक्म पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटंबियांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
महामहिम राष्ट्रपति, आदरणीय प्रधानमंत्री, उपस्थित सभी मंत्री गण, महानुभावों को विवेकानंद केंद्र कन्याकुमारी का अभिवादन और प्रणाम।
— Vivekananda Kendra 🇮🇳 (@vkendra) February 26, 2019
कन्याकुमारी में समुद्र के मध्य में स्थित विवेकानंद शिला स्मारक के ५० वर्ष पूर्ण होने के अवसर पर, विवेकानंद केंद्र के कार्य को...
(1/9) pic.twitter.com/uaQN4bg3nU
“गांधीवादी विचार, महात्मा गांधींनी केलेला संघर्ष, स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी, समाजात मानवी सलोखा निर्माण करण्याचा महात्मा गांधींनी ठेवलेला आदर्श, विरोधकांच्या सद्सद्विवेक बुद्धीला केलेले आवाहन या सगळ्या गोष्टींचा आमच्या वयाच्या काही महान लोकांवर प्रभाव आहे.” असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान म्हटले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat