
क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने “The boys have played really well” असे म्हणत भारतीय वायुसेनेच्या कामगिरीचे कौतुक केले. “सुधर जाओ वरना, सुधार देंगे” असा हॅशटॅग ट्विट करून सेहवागने पाकिस्तानला इशारा दिला.
The boys have played really well. #SudharJaaoWarnaSudhaarDenge #airstrike
— Virender Sehwag (@virendersehwag) February 26, 2019
अभिनेता अजय देवगणने ट्विट करून भारतीय वायुसेनेच्या या कामगिरीला सलाम केला. आमच्याशी पंगा घ्याल तर अशीच हालत होईल अशा आशयाचे ट्विट अजय देवगणने केले आहे.
Mess with the best, die like the rest. Salute #IndianAirForce.@narendramodi.
— Ajay Devgn (@ajaydevgn) February 26, 2019
बॉलिवुडचा खिलाडीकुमार अक्षय कुमारने “मला भारतीय वायुसेनेचा अभिमान आहे. आत घुसून मारा. आता शांत बसायचे नाही”. असे अक्षय कुमारने म्हटले आहे.
Proud of our #IndianAirForce fighters for destroying terror camps. अंदर घुस के मारो ! Quiet no more! #IndiaStrikesBack
— Akshay Kumar (@akshaykumar) February 26, 2019
“स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज पुण्यतिथी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना आजवर अशी मानवंदना कधीच दिली गेली नसेल. अशी मानवंदना आज आपल्या भारतीय वायुसेनेने दिली आहे. अशी प्रतिक्रिया अभिनेते योगेश सोमण यांनी दिली. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ या सिनेमात तत्कालीन केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची भूमिका त्यांनी साकारली होती.
“आजची सकाळ ही खऱ्या अर्थाने चांगली झाली.” असे म्हणत अभिनेते परेश रावल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. भारतीय वायुसेनेच्या वीरांना ‘जय हो’ म्हणत त्यांचे कौतुक केले.
A TRULY BEAUTIFUL GOOD MORNING. THANKS @narendramodi SIR AND BRAVEHEARTS OF OUR ARMY . JAI HO . 🇮🇳🇮🇳🇮🇳
— Paresh Rawal (@SirPareshRawal) February 26, 2019
अभिनेता अभिषेक बच्चनने भारतीय वायुसेनेच्या या कामगिरीला नमस्कार केला.
नमस्कार करते हैं। 🙏🇮🇳
— Abhishek 𝐁𝐚𝐜𝐡𝐜𝐡𝐚𝐧 (@juniorbachchan) February 26, 2019
“नवी दिशा, नवी दशा, नवी रिती, नवी नीती, नव्या भारताला आणि खऱ्या भारताच्या वीरपुत्रांना मी शतश: नमन करतो.” असे गायक कैलाश खेर यांनी ट्विट करत भारतीय वायुसेनेला मानवंदना दिली. तसेच एक भारत श्रेष्ठ भारत असा हॅशटॅग त्यांनी ट्विट केला.
नयी दिशा नयी दशा.. नयी रीति नयी नीति.. नए भारत को, सच्चे भारत के सपूतों को शत शत नमन. #ekbharatshreshthbharat https://t.co/m0fIqhxAz6
— Kailash Kher (@Kailashkher) February 26, 2019
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी ‘ब्रॅवो इंडिया’ असे म्हणत भारतीय वायुसेनेचे कौतुक केले.
BRAVO INDIA 🇮🇳👏🏻👏🏻👏🏻
— Rajinikanth (@rajinikanth) February 26, 2019
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने जय हिंद म्हणत टिविट केले.
परदेशात स्थित असलेली बॉलिवुड अभिनेत्री सेलिना जेटलीने देशप्रेम व्यक्त केले. “याद रहे नाम, नमक और निशान” असे सेलिनाने ट्विट केले आहे.
Yaad Rahe.. naam, namak aur nishaan !!! Saluting our #indianairforce @IAF_MCC our leader and supreme commander @narendramodi @PMOIndia Jai Hind #SurgicalStrike2 #endterrorism
— Celina Jaitly (@CelinaJaitly) February 26, 2019
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat