गुंतवणूकदारांना ‘एअर स्ट्राईक’चा धसका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2019
Total Views |


सेन्सेक्स २४०, निफ्टी ४० अंशांनी घसरले

 

मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने केलेल्या कारवाईचे पडसाद मंगळवारी शेअर बाजारतही पाहायला मिळाले. भारताच्या या कारवाईचा धसका जागतिक गुंतवणूकदारांनी घेतल्याने चौफेर विक्री सुरू होती. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशाक सेन्सेक्स २४० अंशांनी घसरत ३५ हजार ९७३ अंशांवर बंद झाला तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४५ अंशांच्या घसरणीसह १० हजाह ८३५ अंशांवर बंद झाला. मात्र, तो १० हजार ८०० वरील स्तर राखण्यात यशस्वी ठरला.

 

सोमवारी दिवसभराच्या सत्रात सोमवारपेक्षा मंगळवारी ३६ हजार २१३ अंशांच्या तुलनेत २३१ अंशांनी घसरला. एअर स्ट्राईकच्या कारवाईनंतर बाजारात विक्री सुरू झाली. सेन्सेक्सने दिवसभरातील ३५ हजार ७२१ हा निचांक गाठला तर, तो ३५ हजार १६६ अंशांवर जाऊन आला. गुंतवणूकदारांनी लावलेल्या विक्रीच्या सपाट्यामुळे बाजारात मंदी आली. सेन्सेक्समध्ये मिडकॅप, स्मॉलकॅपमध्येही घसरण झाली. सेन्सेक्समध्ये वाहन, गृहपयोगी वस्तू, धातू, उर्जा, तेल आणि नैसर्गिक वायू आणि तंत्रज्ञान क्षेत्र वगळता घसरण नोंदवण्यात आली. निफ्टीमध्ये वाहन, माध्यमे, धातू, औषध उत्पादन क्षेत्र वगळता सर्व ठिकाणी विक्री दिसून आली.

 

अदानी पावर, स्वान एनर्जी, वॅबको इंडिया, केआरबीएल, सिम्फनी, भारती इन्फ्राटेल, टीसीएस, एचसीएल टेक्नोलॉजी, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेट्स आदी शेअर वधारले. टाटा स्टील, अदानी ट्रान्सपोर्ट, आयआयएण्डएफएल, युको बॅंक, एचडीआयएल, येस बॅंक, हीरो मोटोक्रोप, जेएसडब्ल्यु स्टील, एसबीआय आदी शेअर घसरले.

 

आनंद महिंद्रांकडून भारतीय वायू सेनेचे अभिनंदन

भारतीय वायुसेनेच्या एअर स्ट्राईकनंतर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटकरत भारतीय सेनेचे अभिनंदन केले. ते सुरक्षित परत आले आहेत. ही एक मोठी गोष्ट असल्याचे मत व्यक्त करत आपली सुरक्षा करणारे सदैव सुरक्षित राहोत, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले.

 

रुपयाचे अवमुल्यन

मंगळवारी डॉलरच्या तुलनेत गेल्या सत्रापेक्षा रुपया २८ पैशांनी घसरला. सकाळी बाजार खुला होताच तो ७१.२६ च्या स्तरावर होता. दिवसभरात तो ७१.१५ वर कामगिरी करत होता.

 

भारत पाक तणावांचा गुंतवणूकदारांवर दबाव

एंजल ब्रोकिंगच्या मते भारत-पाक तणावामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनी विक्री सुरू केली आहे. भारतीय चलनमुल्यातही घट झाली आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतींची घसरण झाल्याने रुपया सावरेल, अशी आशाही व्यक्त करण्यात येत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@