सिंह बंधुंवर अटकेची टांगती तलवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2019
Total Views |


नवी दिल्ली : आरोग्य सेवा क्षेत्रातील फोर्टीस हेल्थकेअर लिमिटेडने भांडवली बाजार नियंत्रक सेबीकडे धाव घेतली आहे. कंपनी व्यवस्थापनाने "फोर्टीस"चे संस्थापक मलविंदर सिंग आणि शिविंदर सिंग यांना चारशे कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अटक करावी, अशी मागणी सेबीकडे केली आहे.

 

फोर्टीसचे मुख्य प्रवर्तक असलेल्या सिंग बंधुंनी कंपनीचा निधी बेकायदेशीर इतरत्र वळवल्याचा प्रकार तीन महिन्यांपूर्वी उघड झाला आहे. त्यानंतर सेबी, आर्थिक गुन्हे शाखा आणि गंभीर गुन्हे तपास पथक या यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, सेबीच्या तपासात सिंग बंधू दोषी आढळून आले आहेत. त्यानंतर सिंग बंधुना सर्व पैसे व्याजासह तीन महिन्यांमध्ये परत करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्याप सिंग बंधुंनी पैसे परत केलेले नाहीत. त्यापार्श्‍वभूमीवर कंपनी व्यवस्थापनाने सेबीकडे पुन्हा धाव घेतली आहे. सेबीने अधिकारांचा वापर करून सिंग बंधुना अटक करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. गंभीर गुन्हे तपास पथकाने हा घोटाळा दोन हजार कोटींहून अधिक असेल, अशी शक्‍यता वर्तवली आहे. बेकायदा निधी हस्तांतर प्रकरणी मलविंदर सिंग यांने शिविंदर सिंगवर आरोप केले आहे.

 

फोर्टीसचे प्रवक्ता अजय महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सेबीकडे सिंह बंधुंकडून वसुलीसंदर्भातील कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार नियामक मंडळाने दोघांनाही ऑक्टोबर २०१८ मध्ये व्याजासह रक्कम फेडण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी सिंह बंधु आणि सेबीकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. सिंह बंधुंकडील कर्जाचा डोंगर पाहता त्यांना कार्यालयांची विक्री करावी लागली आहे. कर्जाचा बोजा वाढत असून त्यांनी तारण ठेवलेल्या फोर्टीजचे समभागही जप्त करण्यात आले आहेत. फोर्टीसची मालकी आता आयएचएच हेल्थकेयरकडे देण्यात आली आहे. दरम्यान सिंह बंधुंवर जपानी कंपनी दाईची सानक्योने ५० कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी याचिका दाखल केली आहे. दरम्यान या प्रकरणानंतर दोन्ही सिंह बंधुंमध्ये कौटुंबिक तणाव निर्माण झाला आहे. दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@