
नवी दिल्ली : जगभरात मनोरंजन क्षेत्रातला सर्वात मानाचा सन्मान म्हणजे ऑस्कर सन्मान. या सोहळ्याला लॉस एंजलिस येथे सुरुवात झाली असून 'पीरियड: एंड ऑफ सेन्टेन्स' या भारतीय निर्मिती असलेल्या माहिती लघुपटाला 'सर्वोत्कृष्ट लघुपट डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट' हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. गुनीत मोंगा ह्या या माहितीपटाचे निर्मात्या आहेत. इतर पुरस्कारांमध्ये ग्रीन बुक, रोमा, बोहेमिन ऱ्हॅप्सडी आणि ब्लॅक पँथर या चित्रपटांनी बाजी मारली.
WE WON!!! To every girl on this earth... know that you are a goddess... if heavens are listening... look MA we put @sikhya on the map ❤️
— Guneet Monga Kapoor (@guneetm) February 25, 2019
३० वर्षांमध्ये पहिल्यांदाच होस्टविना ऑस्कर सोहळा
९१वा ऑस्कर पुरस्कार सोहळा अनेक कारणांनी स्मरणात राहिल. उदाहरणार्थ या सोहळ्यासाठी कोणताही होस्ट नसेल. याआधी १९८९च्या अकॅडमी अवॉर्ड शोमध्ये असे घडले होते. खरेतर यंदा पुरस्कार सोहळ्याच्या होस्टची जबाबदार अभिनेता आणि कॉमेडियन केविन हार्टवर सोपवली होती. पण काही दिवसांपूर्वी त्याचे जुने ट्वीट्स व्हायरल झाले होते. २००९-१० मध्ये ट्विटवर केलेल्या अँटी-गे स्टेटमेंट्समुळे त्याला हा शो सोडण्यास सांगितले. सोहळा सोडताना हार्टने यासाठी माफीही मागितली होती.
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट - पीरियड: एंड ऑफ सेन्टेन्स
सर्वोत्कृष्ट चित्रपट - ग्रीन बुक
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - अल्फॉन्सो क्वारॉन - रोमा
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - ऑलिव्हिया कोलमन - द फेव्हरिट
सर्वोत्कृष्ट अभिनेता - रमी मॅलेक - बोहेमिन ऱ्हॅप्सडी
सर्वोत्कृष्ट गाणे - शॅलो - अ स्टार इज बॉर्न
सर्वोत्कृष्ट (आधारित) पटकथा - ब्लॅकक्लॅन्समन
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - ब्लॅक पँथर
सर्वोत्कृष्ट (मूळ) पटकथा - ग्रीन बुक
सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन लघुपट - स्किन
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - फर्स्ट मॅन
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म - बाव
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर - स्पायडर मॅन-इन टू द स्पायडर व्हर्स
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - महेरशाला अली - ग्रीन बुक
सर्वोत्कृष्ट संकलन - बोहेमिन ऱ्हॅप्सडी
सर्वोत्कृष्ट चित्रपट (परदेशी भाषा विभाग) - रोमा
सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण - बोहेमिन ऱ्हॅप्सडी
सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन - बोहेमिन ऱ्हॅप्सडी
सर्वोत्कृष्ट छायांकन - अल्फॉन्सो क्वारॉन - रोमा
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन - हॅना बेकलर - ब्लॅक पँथर
सर्वोत्कृष्ट वेशभूषा - रुथ कार्टर - ब्लॅक पँथर
सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा - व्हाईस
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर - फ्री सोलो
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - रेजिना किंग - इफ बील स्ट्रीट कुड टॉक
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat