
नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीर सरकारने फुटीरतावादी नेत्यांवर व्यापक कारवाईचे संकेत दिले आहे. यापूर्वी जम्मू- काश्मीरमधील १८ फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा प्रशासनाकडून हटवण्यात आली होती. तसेच, जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट(जेकेएलएफ)चा प्रमुख यासीन मलिक याला ताब्यात घेण्यात आले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर ८ दिवसांनी ही कारवाई करण्यात आली. तसेच, पोलीस आणि लष्कराला हाय अलर्टवर ठेवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुलवामा हल्ल्यामध्ये ४२ जवान शहीद झाल्यानंतर काश्मीरमधील फुटीरवादी नेत्यांवर कारवाईचे सत्र चालू केले आहे. पहिले त्यांनी सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली, नंतर यासिन मालिकेला बेड्या घातल्या गेल्या. 'कलम ३५ अ' अंतर्गत त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयात कारवाई केली जाईल असे सांगितले जात आहे. याशिवाय पीडीपीचे नेते वाहिद पारा आणि आयएएस ऑफिसर शाह फैजल यांच्यासह इतर १५५ नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही ही कारवाई करण्यात आली आहे.
काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना मिळणाऱ्या आर्थिक निधीचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने फुटीरतावादी नेत्यांसह अन्य काही ठिकाणी रविवारी पुन्हा छापे घातले. यामध्ये पाकिस्तानी चलनासह अन्य परदेशी चलन हस्तगत करण्यात आल्याची माहिती अधिका-यांनी दिली. या छाप्यांमध्ये काही हजार पाकिस्तानी रुपये तसेच संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाचे चलन तसेच काही कागदपत्रे आढळली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat