किसान सभेचे आंदोलन मागे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2019
Total Views |


 


नाशिक : किसान सभेने आंदोलन मागे घेतल्याने पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला यश आले आहे. गिरीश महाजन आणि किसान महासभेच्या शिष्ट मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. ही बैठक सकारात्मक झाली असून किसान सभेच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असल्याची माहिती गिरीश महाजनांनी पत्रकार परिषदेत दिली. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांवर येत्या ३ महिन्यात कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

किसान सभेने मागील वर्षी मंत्रालयावर काढलेल्या पायी मोर्चानंतर शासनाने दिलेल्या आश्वासनाची वर्षभरात पूर्तता न झाल्याने किसान सभेने पुन्हा एकदा पायी मोर्चाचे शस्त्र उगारले आहे. हजारो आदिवासी शेतकऱ्याचा लाँग मार्च मुंबईकडे कूच झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी बैठक घेण्यात आली. यामध्ये सरकारच्यावतीने गिरीश महाजन, जयकुमार रावल, तर किसान सभेच्या वतीने आमदार जे. पी. गावीत, डॉ. अशोक ढवळे आणि डॉ. अजित नवले उपस्थित होते. यामध्ये किसान सभा कोअर टीम बैठकीत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन गिरीश महाजन यांनी दिले आहे. ३ महिन्यात सर्व मागण्या निकाली काढणार असल्याचे गिरीश महाजन म्हणाले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@