सॅरेडॉनची विक्री पुन्हा सुरू होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2019
Total Views |
 
 
 

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सॅरेडोन वरील बंदी मागे घेत अजय पिरामल यांच्या मालकीच्या पिरामल हेल्थकेअर दिलासा दिला आहे. वेदनाशमक सॅरेडोनला फिक्स डोस कॉम्बिनेशनच्या (एफडीसी) यादीतून वगळण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला आहे.

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १३ सप्टेंबर रोजी एकूण ३४९ औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी आणली होती. ७ सप्टेंबरपासूनच या निर्णयाची अंमलजावणी करण्यात आली होती. एफडीसीच्या यादीत पिरामल हेल्थकेअर सॅरेडोन चाही सामावेश होता. आरोग्य मंत्रालयाच्या या निर्णयाविरोधात पीरामलने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पिरामल हेल्थकेअरच्या सॅरेडोन , ग्लॅक्सो स्मिथ क्लाईनच्या प्रीटोन, जग्गट फार्माच्या डार्ट आदी उत्पादनांवर लावण्यात आलेली बंदी हटवण्यात आली. या निर्णयानुसार, एफडीसीच्या यादीतून सॅरेडोन ला पूर्णपणे वगळण्यात आले आहे.

 

या निर्णयामुळे आम्ही समाधानी आहोत. भारतीय उपभोक्त्यांच्या पूर्णपणे सुरक्षित आरोग्याबद्दल आम्ही कटीबद्ध आहोत. या संपूर्ण प्रक्रियेत आमचा कायद्यावर पूर्णपणे विश्वास होता.

नंदिनी पीरामल, कार्यकारी निर्देशक,पिरामल हेल्थकेअर

 

पीरामल हेल्थकेअरचा २०५० कोटींचा वाटा

एका अहवालानुसार, देशातील वेदनाशमक औषधांची बाजारपेठ ही ६ हजार ४५० कोटींची आहे. त्यापैकी पीरामल हेल्थकेअरचा २ हजार ५० कोटींचा हिस्सा आहे. सेरेडॉनचा ग्राहकवर्ग पाहता एका सेकंदात ३१ इतकी विक्री देशभरात होते. पिरामल एन्टरप्रायझेसच्या एकूण ९ लाख दालनांमधून ही विक्री होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@