पीएफधारकांना दिलासा; व्याजदरात वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2019
Total Views |
 

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य संघटनेने (ईपीएफओ) २०१८-१९ या वर्षासाठी सहा कोटीहून अधिक सदस्यांना कर्मचारी भविष्य निधीवर (ईपीएफ) ८.६६ टक्के व्याजदर लागू केला आहे. यापूर्वीचा दर ६.५५ टक्के इतका होता. केंद्रीय मंत्री सुशील गंगवार यांनी ही माहिती दिली.

 

ईपीएफओच्या केंद्रीय मंडळ सदस्यांनी २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. केंद्रीय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील या मंडळाने चालू आर्थिक वर्षासाठीच्या व्याजदराबद्दल हा निर्णय घेतला. गंगवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंडळ समितीच्या प्रस्तावाला अर्थमंत्रालयाच्या मंजूरीची गरज आहे. यानंतर खातेधारकांना व्याज मिळेल.

 

यापूर्वीच उच्च पदस्थ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार ईपीएफमध्ये जमा रकमेवर व्याजदर वाढवेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. २०१७-१८ मधील ८.५५ टक्के हा व्याजदर सर्वात कमी दर होता. २०१६-१७ मध्ये तो ८.६५ टक्के, २०१५-१६ मध्ये तो ८.८ टक्के, २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये तो ८.७५ टक्के होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@