
मुंबई : महिला व बालविकास, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना मदत करण्याचे आवाहन केले होते. सोशल मीडियावर व्हिडिओ क्लीपच्या माध्यमातून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली व कुटुंबियांना आर्थिक आधार देण्याचे आपले कर्तव्य असल्याचे सांगत मदतीचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत ग्रामविकास, महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एक लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचा धनादेश पंकजा यांच्याकडे सुपूर्द केला.
All the officers, CO, SDO Secretaries and staff of my RD and WCD Departments contributed towards 'Bharat Ke Veer' fund to support our brave martyrs#VironKeSaathMaharashtra @BJP4India @BJP4Maharashtra @PMOIndia @HMOIndia @CMOMaharashtra @crpfindia #PulwamaAttack #Jaihind pic.twitter.com/kYffbORaAL
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) February 18, 2019
शहीद जवान हे त्यांच्या कुटुंबाचे आधारस्तंभ होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना भावनिक आणि आर्थिक आधार देणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. हीच भावना लक्षात घेऊन आपल्या अधिनस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना, उमेद व माविमच्या महिला बचतगटांना, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कमीत कमी २१ रूपये देणगी स्वरूपात देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ‘भारत के वीर’ या नावाने रकमेचा धनादेश देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले होते. पंकजा यांच्या आवाहनानंतर लगेचच एक लाख रुपयांचा निधी जमा झाला असून मदतीचा ओघ सुरूच आहे.
An appeal to contribute to “Bharat Ke Veer” fund to support martyrs by Bank transfer OR Cheque OR Cash deposit in –
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) February 17, 2019
State Bank of India – New Delhi Main Br
Account Name – Bharat Ke Veer
Account No. – 36724508925
IFSC – SBIN0000691#VironKeSaathMaharashtra @HMOIndia @crpfindia pic.twitter.com/gOupaJ3RAl
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat