‘क्रेडाई’कडून हुतात्म्यांच्या कुटूंबियांना घरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2019
Total Views |
 
 

मुंबई : कंफेडरेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (क्रेडाई) जम्मू काश्मिरमध्ये पुलवामामध्ये हुतात्मा झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या कुटूंबियांना प्रत्येकी टुबीएचके फ्लॅट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. क्रेडाईचे अध्यक्ष जक्षय शाह यांनी दिली.

 

जक्षय शाह म्हणाले, दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटूंबियांच्या पाठीशी क्रेडाई उभी आहे. याच पार्श्वभूमीवर हुतात्मा जवानांच्या कुटूंबियांना प्रत्येकी टुबीएचके फ्लॅट देण्याची घोषणा केली आहे. शहिद जवानांच्या निवास्थानानजीक आणि त्या त्या राज्यांत ही घरे दिली जातील. क्रेडाईचे सर्व १२ हजार ५०० सदस्य हुतात्म्यांच्या कुटूंबियांच्या दुःखात सामील आहेत. क्रेडाई ही विकसकांची देशव्यापी संघटना आहे. ज्यात तेवीसहून अधिक राज्यातील २०३ शहरातील विकसक सदस्य आहेत.

 
 

दरम्यान यापूर्वी देशातील सर्वात मोठी सरकारी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडियाने हुतात्मा झालेल्या सीआरपीएफ जवानांची कर्जे माफ करण्याची घोषणा केली आहे. शहीद झालेल्या एकूण २३ जवानांच्या कर्जे माफ करण्यात आली आहेत.

 

रिलायन्स फाऊंडेशननेही आता हुतात्मा जवानांसाठी मदत जाहीर केली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांनी रिलायन्स फाऊंडेशनतर्फे जवानांच्या मुलांच्या शिक्षण आणि नोकरीची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे सांगितले आहे. याशिवाय सरकारकडून मिळणाऱ्या संबंधित सूचनांचीही पूर्तता करू, असे आश्वासन अंबानी यांनी दिले आहे.


माहितीच्या
महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@