भांडवली बाजारात मोठी घसरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2019
Total Views |
 

मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीला भांडवली बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३१०.५१ अंशांनी घसरला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८३.४५ अंशांनी घसरला. सोमवारी सकाळापासूनच आयटी आणि एफएमसीजी क्षेत्रात झालेल्या घसरणीने झाली. दिवसभरात सेन्सेक्स ३५ हजार ४९४ अंश इतक्या निच्चांकावर पोहोचला होता.

 
 

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सोमवारी १० हजार ६४० अंशांवर बंद झाला. निफ्टीमध्ये १३ शेअर वधारले तर उर्वरित सर्व शेअरची घसरण नोंदवण्यात आली. सेन्सेक्स मिडकॅप १४५ अंशांच्या घसरणीसह १३ हजार ११८ अंशांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये टेलिकॉम, रियल्टी क्षेत्र वगळता सर्व शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली. निफ्टी मिडकॅपही ०.९० टक्के घसरणीसह ४ हजार ४०५ अंशांवर बंद झाला.

 

दरम्यान, रिलायन्स कम्युनिकेशन १०.९१ टक्के, रिलायन्स पावर १०.७८ टक्के, रिलायन्स इन्फ्रा ६.९६ टक्के आदी शेअर वधारले. निफ्टीमध्ये भारती इन्फ्राटेल, ३.१३ टक्के, ओएनजीसी १.५९ टक्के, झी एन्टरटेन्मेट १.५१ टक्के, टाटा मोटार्स ०.९० टक्के, एक्सिस बॅंक ०.८४ टक्के तेजीत होते. याशिवाय सेन्सेक्सच्या मंचावर एचपीसीएल ८.४६ टक्के, फिनोलेक्स इन्डस्ट्रीज ७.७५ टक्के, रेपको होम ७.४६ टक्के आयआयएफएल ७.१३ टक्के आदी शेअर घसरले. निफ्टीच्या मंचावर इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स ३.५ टक्के, टीसीएस २.९६ टक्के, येस बॅंक २.२८ टक्क्यांनी घसरले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@