ग्राहकांचे पैसे धोक्यात, आरबीआयचा अलर्ट जारी

    17-Feb-2019
Total Views |



मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने नव्या प्रकारच्या आर्थिक फसवणुकीचा इशारा बँकांना दिला आहे. युपीआय अॅपद्वारे ग्राहकांच्या खात्यातील हजारो कोटी रुपयांना हॅकर्स चुना लावू शकतात. त्यामुळे हे अॅप डाऊनलोड करू नका, असा इशारा रिझर्व्ह बँकेतर्फे जारी करण्यात आला आहे.

 

आर्थिक घोटाळेबाज ग्राहकांना एनी डेस्क अॅप पाठवतात आणि डाऊनलोड करायला सांगतात. त्यानंतर हॅकर्स मोबाईलवर आलेल्या नऊ डिजिटच्या कोडद्वारे पीडिताचा फोन रिमोटवर घेतात. या अॅप कोडला मोबाईलमध्ये टाकताच, हॅकर्सकडून ग्राहकांना काही परवानग्या मागितल्या जातात. अशाप्रकारे ग्राहकांच्या मोबाईल फोनची माहिती मिळवून त्यांच्या अकाऊंटमधून रक्कम काढली जाते.

 

युपीआय किंवा वॉलेट आदी पेमेंटशी संबंधित कोणत्याही मोबाईल बॅंकींग अॅपद्वारेही आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्रीय बँकेने सर्व कमर्शिअल बँकांना दक्षतेचा इशारा जारी केला आहे. बँकेत खाते असलेल्या अनेक ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असल्यानेच बँकांनी हा इशारा दिल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat