बचतगटासाठी शून्य टक्के व्याजाने कर्ज पुरवठा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2019
Total Views |


 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यवतमाळ येथे घोषणा

 

यवतमाळ : बचतगटांना व्यवसाय उद्योगासाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत त्यांनी ही घोषणा केली. बचतगटांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड संपूर्ण होत आहे. कर्जफेडीत महिला प्रामाणिक असल्यामुळे त्यांना आता व्यवसाय उद्योगासाठी शून्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

 

विदर्भातील विविध विकासकामांच्या उदघाटन व लोकार्पण कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी उपस्थित होते. यावेळी मोदींनी केंद्र सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती दिली. ते म्हणाले, "यवतमाळसह राज्यात महिला बचतगटांचे मोठे जाळे आहे. बचतगटातील महिला या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा व्हाव्यात, यासाठी अडीच पट जास्त निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांना उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आवास योजनांचा लाभ देण्यात आला असून त्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणाला गती मिळण्यास मदत होत आहे." यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री मदन येरावार आदी उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@