कुणी तरी सांगाल का, प्रेम नक्की काय असते?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Feb-2019
Total Views |

‘व्हॅलेंटाईन डे’बाबत तरुणाईची रोखठोक मते

 
 
जळगाव, १३ फेब्रुवारी
‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजे प्रेमाचा दिवस. जगभरात हा दिवस साजरा केला जात आहे. प्रेमींसाठी हा दिवस खास क्षणच असतो. एखाद्या व्यक्तीबद्दल मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणून व्हॅलेंटाईन्स डेकडे पाहिलं जाते. आजच्या दिवशी प्रत्येक जण आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा, संदेश व भेटवस्तू देऊन एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करतात. याबद्दल जळगावातील काही तरुण व तरुणाई हे या दिवसाकडे कोणत्या दृष्टीने बघतात यासाठी ‘तरुण भारत’ने त्यांची मते जाणून घेतली.
 
 
व्हॅलेंटाईन डे हा दिवस जरी ख्रिश्चन धर्माचा असला, तरी हा दिवस सगळ्यांनीच प्रेम दिन म्हणून साजरा करायला पाहिजे. असे नाही की, हा दिवस गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड हेच साजरा करू शकतात. मी तर माझा व्हॅलेंटाईन डे माझ्या मस्तीखोर मित्रांसोबत साजरा करतो.
-रविकुमार परदेशी
 
 
प्रेम म्हणजे एकमेकात गुंतलेले जीव तसे सगळेच म्हणतात. हाच प्रेमाचा दिवस जगभरात १४ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस कोणी सकारात्मकतेने साजरा करतो तर काहीजण नकारात्मक पद्धतीने या दिवसाला बघतात. पण माझ्यासाठी हा दिवस अविस्मरणीय असतो. कारण प्रेम करण्याचा कोणताही एक दिवस ठरवून प्रेम करता येत नाही. पण हा दिवस माझ्यासाठी खासच असतो.
-विशाल धनगर
 
 
भारतीय संस्कृती सोडून आजचे तरुण-तरुणी हे पाश्चात्य संस्कृतीकडे जास्त वळतात. एकप्रकारे आपली संस्कृती विसरत चाललेले तरुण आपल्या प्रेयसीला दिलेले प्रॉमिसवरून व्हॅलेंटाईन डेमार्फत पूर्ण करतात. परंतु आपल्या आई-वडिलांना भविष्याबद्दलचे दिलेले प्रॉमिस आज ते विसरत आहे. त्यामुळे माझ्या मते तरी हा दिवस साजरा करण्याची गरज नाही. नेहमीच सगळ्यांवर प्रेम करा.
-कमलेश बारी
 
 
आजची पिढी व्हॅलेंटाईन डे कडे वेगळ्याच नजरेने बघते. पण हा दिवस सगळ्यांसाठी खास असतो तर सगळ्यांनी मिळून साजरा करायला हवा.
-नेहा गुरसाळे
 
 
आजच्या आधुनिक काळात व्हॅलेंटाइन डे फक्त दोन प्रेमी साजरा करतात. पण वास्तविक तसं काही नसतं. व्हॅलेंटाईन डे हा आई आणि मुलगी भाऊ बहीणसुद्धा सेलिब्रेट करतात. हा दिवस प्रेमाचा दिवस आहे.
-साक्षी ठोसर
 
 
व्हॅलेंटाईन डे हा फक्त प्रियकर व प्रियसी हेच साजरा करू शकतात, असे नाही. तर आपण आपल्या परिवारासोबत मित्र-मैत्रिणींसोबत साजरा करू शकतो.
-कविता चौधरी
 
 
व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस म्हणून आपण सगळेच परिवार तसेच मित्र-मैत्रिणी सोबत साजरा करतो. परंतु काही प्रेमवीरांनी त्याचा अतिरेक केल्यामुळे या दिवसाला काही जण वेगळ्याच नजरेने बघतात. तर असे न करता हा दिवस सगळ्यांसोबत आनंदाने साजरा केला पाहिजे.
-पार्थ ठक्कर
 
 
गुलाबाचं फुल देणं किंवा महागडे गिफ्ट देणे, या हेतूने काही तरुण तरुणाई व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. परंतु, हा प्रेमदिवस सगळ्यांनी मिळून साजरा करायला हवा.
-जागृती भावसार
 
@@AUTHORINFO_V1@@