एरंडोलला जमावाकडून पोलिसांना मारहाण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Feb-2019
Total Views |

आठ संशयितांना ५ दिवस पोलीस कोठडी, गावात तणावपूर्व शांतता

 
एरंडोल, १३ फेब्रुवारी
गायींची अवैध वाहतूक प्रकरणी विखरण रिंगणगाव रस्त्यावर मंगवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक अरुण हजारे यांच्यासह अन्य पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी आठ संशयितांना पोलिसांनी अटक केली असून सर्वांना न्यायालय समोर हजर केले असता सर्वाना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीश नितेश बंडगर यांनी दिला.
 
 
दरम्यान संशयितांना अटक केल्यानंतर रिंगणगाव परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन परिसरात गर्दी केली होती.आ. डॉ.सतीश पाटील व माजी आमदार चिमणराव पाटील यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन झालेल्या घटने बाबत माहिती जाणुन घेतली.नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम ठेवावा.असे आवाहन लोक प्रतिनिधींनीी ग्रामस्थांना केले.रिंगणगाव परिसरात तणावपुर्ण शांतता आहे.
 
 
१२ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास रवंजे कडून भरधाव वेगाने जाणा-या जीप क्रमांक एम.एच.१९ एस.८२७० मध्ये चार गायी असल्याचे काही ग्रामस्थांना दिसुन आले. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये जिप गाडीचे चाक गेल्यामुळे चार पैकी एका गायीने उडी मारल्यामुळे सदरच्या गायी चोरीच्या आहेत व त्या कत्तलीसाठी नेल्या जात आहेत असा संशय ग्रामस्थांना आल्यामुळे ग्रामस्थांनी गाडी अडवली व चालकाकडे गायीं बाबत चौकशी केली.चालक अंधाराचा फायदा घेऊन फरार होण्यात यशस्वी झाल्यामुळे ग्रामस्थ अधिकच संतप्त झाले.
 
 
याबाबत रिंगणगावचे पोलीस पाटील हुकुमचंद पाटील यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला माहिती दिली.पो.नि.अरुण हजारे व उपस्थित पोलिसांनी आम्ही गाडी पोलीस स्टेशनला नेत आहे.संबंधितान विरुद्ध चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे ग्रामस्थांना सांगितले. मात्र ग्रामस्थ संतप्त झाले होते.
 
 
यावेळी रात्रीची वेळ असल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन ग्रामस्थांनी पोलिसांचे न ऐकता गाडीतील गायी खाली उतरवल्या व जीपची तोडफोड करून पेटवुन दिले.ग्रामस्थांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता ग्रामस्थांनी पो.नि. हजारे यांचेसह पोलीस कर्मचारी संदीप सातपुते, उमेश पाटील यांना देखील मारहाण केली.
 
 
संदीप सातपुते यांच्या डोक्यात लाकडी काठीने मारल्यामुळे त्यांच्या डोक्यास दोन टाके पडले.याबाबत पोलीस कर्मचारी उमेश देविदास पाटील यांचे तक्रारीवरून पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.मारहाण प्रकरणी प्रमोद पाटील, महेंद्र माळी, शिवाजी पडोळ, वाल्मिक शिंदे, रामकृष्ण रोहीमारे, योगराज लंके, निलेश पडोळ या आठ संशयितांना अटक केली असुन त्यांना न्यायालया समोर हजर केले असता सर्व संशयितांना पाच दिवस पोलीस कोठडीत मिळाली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@