जिल्हाधिकारी कार्यालयात बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Feb-2019
Total Views |
 
जळगाव :
जिल्हाधिकारी कार्यालयात वाहनतळाची व्यवस्था असूनही वाहनतळ सोडून अन्य जागी वाहने उभी करणार्‍या वाहनधारकांनी विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली.
 
 
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विविध कामांसाठी जिल्हाभरातून अनेक नागरिकांसह अन्य अधिकारीदेखील येतात. या फाफटपसारर्‍यात या परिसरातच अनधिकृत वाळू गौण खनिज वाहतूक करणारी वाहने जप्ती करण्याची कारवाई केलेली वाहनेदेखील चाकांची हवा काढलेल्या अवस्थेत उभी आहे. अशा गर्दीत अनेक दुचाकीधारकच नव्हे तर अधिकारी कर्मचारी वर्गाची वाहने ही वाट मिळेल तेथे बेशिस्तपणे उभी करण्यात आलेली असतात.
 
 
बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात वाहतूक प्रशासन विभागातर्फे सुमारे १० दुचाकी वाहन धारकांवर दोनशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येऊन सोडून देण्यात आले. नूतन जिल्हाधिकारी यांचे साठी केवळ देखावा नव्याची नवलाई नऊ दिवस ठरू नये. अनधिकृत ठिकाणी वाहने उभी करण्याच्या कारवाईत सातत्य असावे .अन्य ठिकाणी देखील बेशिस्त वाहन पार्किंगसह लेन कटिंगसह भरधाव वेगाने जाऊन सिग्नल तोडणे, बेंडाळे महिला विद्यालय मार्गाने थेट विरुद्ध दिशेने अनेक दुचाकी वाहन धारक वाहने घेऊन जातात.जुन्या नगरपालिका मोकळ्या मैदानावर दुचाकी चारचाकी वाहन तळ व्यवस्था मनपाकडून देण्यात आली असून सुद्धा जुन्या जिल्हा परिषद भवना जवळ देखील अनधिकृत वाहनतळ दिसून येतेे.
याकडेदेखील वाहतूक प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे अशी नागरिकांची चर्चा आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@