दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने चोरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2019
Total Views |

पोलिसांनी घेतली तातडीने दखल; युवकांच्या धाडसाने चोरटा जेरबंद

 

 
 
चाळीसगाव. :
   दागिन्यांना पॉलिश करून देतो, असे सांगत दोघा भामट्यांनी वृद्धेचा विश्वास संपादन करून सुमारे दीड लाख रुपयाचे दागिने लंपास केल्याची घटना नेताजी चौकातील गवळीवाड्यात मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. या घटनेची वार्ता परिसरात पसरताच तरुणांनी शोध घेऊन एका भामट्यास धुळे रस्त्यावर पकडून शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
 
 
शहरातील नेताजी चौकातील गवळीवाडा भागातील कुसुम पाठक या सकाळी अकराच्या सुमारास घराबाहेर ओट्यावर भाजी निवडत असतांना दोन भामटे तेथे आले. त्यांनी आम्ही पितळी भांड्यांना पॉलिश करून देतो, असे सांगितले. पाठक यांनी त्यांच्या अमिषाला बळी पडून भांडी पॉलिश करण्यासाठी दिल्या. त्यावेळी या भामट्यांनी आम्ही सोन्याचे दांगिनेही पॉलिश करतो, असे सांगितले. गोड बोलून आजीबाईंकडून २२ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या व २० ग्रॅम सोन्याची पोत असे सुमारे दीड लाखाचे दागिने पॉलिश करण्यासाठी घेतले. यावेळी आजीबाईंच्या सूनबाई घरात होत्या. सोन्याचे दागिने पॉलीश करण्याचा बहाणा करीत ते एका तांब्यात टाकल्याचे भासवत त्यात पाणी व हळद टाकून ते गरम टाकण्यासाठी आजीबाईंकडे दिले. आम्ही शेजारी जावून येतो असे सांगत त्यांनी तेथून काढता पाय घेतला. आजीबाईंनी घरात जावून ताब्यांतील पाणी तापवले व त्या बाहेर ओट्यावर आल्या असता ते दोघे भामटे तेथे दिसले नाही. त्यांनी घरातील सुनबाई व मुलाला हा प्रकार सांगितला. शेजारी हा प्रकार कळाल्यानंतर परिसरातील तरुणांनी भामट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. चोरटे धुळे रस्त्यावरील पुन्शी पेट्रोल पंपाजवळ आढळून आले.
 
 
तरुणांनी चांगलाच चोप देत शहर पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी योगिता पाठक यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून शहर पोलीस ठाण्यातील पथकाने कारवाई करीत त्याच्या साथीदाराला धुळे येथून ताब्यात घेतल्याने धाडसी युवकांसह पोलिसांच्या कारवाईचे अभिनंदन होत आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@