मुंबई : पंजाब नॅशनल बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी परदेशात पलायन केलेला उद्योगपती नीरव मोदी याचा अनधिकृत बंगला तातडीने पाडण्याच्या सूचना पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बुधवारी दिल्या. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड समुद्रकिनारी असलेल्या अनधिकृत बंगल्यांचा आढावा कदम यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी त्वरित हा बंगला पाडण्याचे आदेश दिले.
अलिबाग, मुरुड समुद्रकिनारी असलेल्या अनधिकृत बंगले पाडण्याचे काम राज्य सरकारने हाती घेतली आहे. यामध्ये आर्थिक गैरव्यवहार करून परदेशी पलायन केलेल्या नीरव मोदी याचाही बंगला आहे. दरम्यान, हा बंगला पाडण्याचे आदेश पर्यावरण मंत्र्यांनी दिले. नीरव मोदी याचा बंगला पाडण्याचे काम सुरु असून पुढील आठवड्यात त्यासाठी ब्लास्टिंग करण्यात येणार आहे. आतापर्यंत २४ बंगले पाडण्यात आल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दिली.
रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करा
दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यातील विविध जेटींची आणि रस्त्यांची कामे तसेच धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे कदम यांनी यावेळी दिले. दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यातील १५ जेटींची कामे लवकरच सुरु होत असून जिल्हा वार्षिक योजनेची ३१ कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.
माहितीच्यामहापुरातरोजच्यारोजनेमकामजकूरमिळविण्यासाठीलाईककरा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat