यावल, १२ फेब्रुवारी
येथील बसस्थानकावर मंगळवारी सकाळी मध्यप्रदेशातून आलेल्या एका एसटीमधून दोन पोती गुटखा जप्त केला आहे गुटखा नेमका कुणाचा हे मात्र समजू शकले नाही.एसटी बसमध्ये वाहकाला पोलिसांनी विचारले असता त्याला देखील त्यासंदर्भात उत्तर देता आले नाही. हा गुटखा पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतला आहे.
मंगळवारी सकाळी यावल बसस्थानकावर बर्हाणपूर अंकलेश्वर ही बस दाखल झाली होती. या बसमधून मध्यप्रदेशातून अवैधरित्या गुटखा येत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर, हवालदार संजय तायडे हे पथकासह दाखल झाले. बसमधून दोन पोती गुटखा पोलिसांनी ताब्यात घेतला. सदर गुटखा कुणाचा हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.
पोलिसांनी गुटखा ताब्यात घेतला असून याबाबत अन्न औषध प्रशासनाच्या उपायुक्तांना कळविण्यात आले. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात अशा प्रकारे तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. पोलीस खात्याच्या कार्यक्षमतेवर चिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.