जामनेरात एकाच रात्री तीन घरफोड्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Feb-2019
Total Views |

परिसरात भितीचे वातावरण, चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आवाहन


 
जामनेर, ११ फेब्रुवारी
शहरातील वाकी रोड भागात ११ च्या मध्यरात्री सलग तीन ठिकाणी घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करुन चोरट्यांनी पोलिसांसमोर आवाहन उभे केले आहे. या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
सेवानिवृत्त मुख्याध्यापक भिमसिंग फत्तेसिंह पाटील रा. पाटील वाडी हे आपल्या कुटुंबियांसह झोपले असताना त्यांच्या पत्नीला अचानक घराचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला. त्या दरवाजाच्या जवळ गेल्या असता बाहेरून दरवाजा कोणीतरी लोटत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्यांना विरोध केला परंतु ४ चोरट्यांनी त्यांना न जुमानता घरात प्रवेश केला. त्यांनी आरडाओरडा सुरू करताच चोरट्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून पती-पत्नीला जवळ करून पत्नीच्या अंगावरील सोन्याचे दागदागिने उतरवून व कपाटातील दागिने असा एकूण ६४ हजारांचा माल घेऊन पोबारा केला. त्यानंतर याच रोडवरील भानुदास सुकदेव निकम रा. सम्राट अशोक नगर व पवन नरसिंग सपकाळे रा. धनपुष्प कॅालनी यांच्याकडेही चोरट्यांनी लाखों रुपयांचा मुद्देमाल लुटून हात साप केला. भिंमसिंग फत्तेसिंग पाटील यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्तींविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश काळे व सहकारी करीत आहेत.
 
रात्रभर ‘चोर पोलिसांचा खेळ’
चोरटे हे चोरी झाल्यावर त्याच घर मालकाला पोलिसांना चोरी झाल्याचे कळवायला सांगायचे व पुढील ठिकाणी चोरी करण्यासाठी निघून जायचे. जणू काही शहरात रात्रभर ‘चोर पोलिसांचा खेळ’ सूरु होता. जळगावहून घटनास्थळी श्वान पथक व फिंगर प्रिंट एक्स्पर्ट चोरट्यांचा यांचे पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी संशीयत म्हणून ३-४ कामगार चौकशी साठी ताब्यात घेतले होते. परंतु चौकशीनतंर त्यांना सोडून देण्यात आले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@