जागा मिळविण्यासाठी जीवघेणी कसरत...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Feb-2019
Total Views |

चालत्या बसमध्ये उडी घेतात विद्यार्थी, अपघात झाल्यास कोण जबाबदार ?


 
 
जळगाव, ११ फेब्र्रुवारी
जळगाव हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथे चाळीसगाव, चोपडा, रावेर, भुसावळ, यावल, जामनेर आदी ठिकाणाहून विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज येण-या करतात. जळगाव आगार स्थानकात दुपारच्या वेळी शाळा, महाविद्यालयातून जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिंनी गावी परतण्या साठी येतात. परंतु प्रत्येक तालुक्या साठी एकाच वेळी एसटी बस जाते. त्यामुळे विद्यार्थी, वृद्ध, महिला, बालके बसमध्ये जागा मिळविण्यासाठी जीवघेणी कसरत करतात. तसेच जामनेर, रावेर, अमळनेर, चोपडा मार्गे जाणार्‍या बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांमध्ये अनेक वेळा वादही उद्भवतात.
 
 
नवीन बस स्थानकावर येणार्‍या बसची थांबण्याची वाट न बघता अनेक विद्यार्थी चालत्या बसमध्ये खिडकीद्वारे आत प्रवेश करतात. यामुळे केव्हा मोठा अपघात होवून जीवितहानी झाल्यास कोण जबाबदार राहील? असा प्रश्‍न सूज्ञ नागरिकांना पडत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
 
 
जागा मिळविण्यासाठी कुणी रुमाल, बॅग आदी शिटवर ठेवतात. परंतु गाडी थांबल्यावर दुसरा येथे बसतो. त्यामुळे रोज असे वाद होत असतात.
 
 
नवीन बस आगारात पक्का रस्त्याअभावी येथे नेहमी धुळ असते. तसेच या ठिकाणी रस्त्यावर गुढघ्यापर्यंत खोल खड्डे झाल्याने प्रवाशांना पायी चालणेही जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
 
 

 
रोडरोमिओंचा वावर वाढला...
नवीन बसस्थानकावर रोडरोमिओं दिवसभर येथेच पडून राहतात. यांच्यामध्ये वाद होवून त्याचा त्रास इतर प्रवाशांना होत असतो. तसेच काही वेळा मुलींचे नाव घ्यायला ते कमी करीत नाही. परंतु अनेक वेळा मुलीं टवाळखोरांची तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे त्यांचे पाठबळ वाढल्याने त्यांच्या टवाळखोरीचे प्रकार रोज घडत आहेत. दरम्यान मुली व महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीसांनी नियमित थांबावे अशी अपेक्षा प्रवाशी करीत आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@