माझ्या मतदारसंघात जातीयवादाला थारा नाही : गडकरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Feb-2019
Total Views |
 

पुणे : माझ्या मतदारसंघात जातीयवादाला अजिबात थारा नाही तसेच जातीयवादावर बोलणाऱ्याला मीफोडून काढेन," असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना दिला. पिंपरी-चिंचवड येथेपुनरुत्थान समरसता गुरुकुलमतर्फे रविवारी एका कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते.

 

मी जातीयवादावर विश्वास ठेवत नाही. तुमच्या इथली परिस्थिती मला ठाऊक नाही. पण आमच्या पाच जिल्ह्यांमध्ये जातीयवादाला थारा नाही. आर्थिक, सामाजिक समानतेच्या आधारे समाजाला एकत्र आणले पाहिजे आणि त्यात जातीयवाद आणि सांप्रदायिकतेला थारा देऊ नये, असे स्पष्ट मत गडकरींनी यांनी व्यक्त केले. जर कुणी जातीवर बोलेल त्याला बदडून काढेन, असा इशारा मी दिला आहे, असे बोलत त्यांनी या प्रकरणी प्रतिक्रीया व्यक्त केली.

 

गडकरी स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत आहेत. मुंबईतील एका कार्यक्रमात त्यांनी नेत्यांबाबत टिप्पणी केली होती. स्वप्न दाखवणारा नेता लोकांना आवडतो, पण दाखवलेली स्वप्ने पूर्ण केली नाहीत तर लोक त्या नेत्याला झोडपल्याशिवाय राहत नाहीत, असेही ते म्हणाले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@