#LIVE : कर्नाटक पोटनिवडणूक निकाल : भाजपची सुरुवात आघाडीने...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2019
Total Views |


ssf_1  H x W: 0

 


नवी दिल्ली : ५ डिसेंबरला झालेल्या कर्नाटक पोटनिवडणुकीच्या निकाल आज लागणार आहे. विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष आर. के. रमेश कुमार यांनी १७ आमदारांना अपात्र ठरवले होते. त्यानंतर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने ते आमदार पोटनिवडणूक लढू शकतात, असा निर्णय दिल्यानंतर त्या सर्व आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या सर्व आमदारांनी भाजपकडून निवडणूक लढवली आहे. भाजपला येथे सत्ता राखण्यासाठी १५ जागे पैकी ६ जागा जिंकण्याची गरज आहे. या पोटनिवडणुकीत ६७.९१ टक्के मतदान झाले होते.

 

वाचा कर्नाटक पोटनिवडणूक निकाल :

 
>> जनतेचा कौल आम्ही स्वीकारतो, आम्हाला पराभव मान्य : काँग्रेस नेते डिके शिवकुमार 
 

>> जनता दल एका जागेवर आघाडीवर

 

>> काँग्रेसची २ जागांवर आघाडी

 

>> भाजपची ११ जागांवर आघाडी

 

>> भाजपला १० जागांवर आघाडी, तर काँग्रेस २ जागांवर पुढे

@@AUTHORINFO_V1@@