गरिबांचा देवदूत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2019   
Total Views |

roshni_1  H x W

मनसे अध्यक्ष राज ठाकरे कडोंमपा परिवहन वाहक-चालकांना प्रल्हाद म्हात्रे यांनी मदत केलेला धनादेश देताना.



डोंबिवली : डोंबिवली शहर सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. याच डोंबिवलीतील उत्तम कीर्तनकार तसेच राजकीय क्षेत्रात सक्रीय असलेले प्रल्हाद म्हात्रेगरिबांचा देवदूतम्हणून ओळखले जातात. सामाजिक क्षेत्रात त्यांचे सुरू असलेले काम हे वाखणण्याजोगे आहे.

म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वी विश्वनाथ सहस्त्रबुद्धे या एकटे राहणार्‍या आजोबांचे पालकतत्व स्वीकारले होते. कुटुंब आणि नातेवाईकांशी ताटातूट झाल्यामुळे आजोबांना रस्त्यावरच राहावे लागत होते. त्यांची बिकट अवस्था पाहून दीपक म्हात्रे यांनी आजोबांना दत्तक घेतले. तेव्हापासून या आजोबांना जगण्याच्या आशेचा किरण मिळाला. म्हात्रे यांनी आजोबांचे पालकत्व स्वीकारल्यानंतर त्यांची राहण्याची व्यवस्थासाधना आधार वृद्ध सेवा केंद्रा केली. गेल्यावर्षीपासून हे आजोबा या वृद्धाश्रमात आनंदात जीवन व्यतीत करत होते. मात्र, वार्धक्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. आयुष्यातील सर्व मूलभूत गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारल्यामुळे आजोबा आजारी असल्याची माहिती मिळताच म्हात्रे यांनी तातडीने त्यांना पश्चिम डोंबिवलीतल्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले.


वार्धक्यामुळे
विश्वनाथ सहस्रबुध्दे यांचे अवयव निकामी होत गेले. आजोबांवर होणारा उपचाराचा सर्व खर्च म्हात्रे यांनी उचलला. अखेर सोमवारी नोव्हेंबर रोजी सहस्त्रबुध्दे आजोबांनी अखेरचा श्वास घेतला. निराश्रित आजोबांची अखेरच्या श्वासापर्यंत सेवा करण्याची हमी घेतल्यामुळे म्हात्रे यांनी आपल्या काही सहकार्‍यांच्या मदतीने शिवमंदिर मोक्षधाम येथे आपल्या पित्याप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक सामाजिक कार्यात प्रल्हाद नेहमीच सर्वांना मदत करीत असतात. अत्यंत हालाखीची परिस्थिती असलेल्या एका दाम्पत्याला आपल्या मुलीचे लग्न करता येत नव्हते. ही बाब प्रल्हाद म्हात्रे यांना समजताच त्यांनी या मुलीच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली.


डोंबिवलीतील
एकनाथ महाडिक सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करणारे आहेत. यांना आदर्श नावाचा लहान मुलगा आहे. वैद्यकीय निदानानंतर आदर्शच्या हृदयाला छिद्र असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शस्त्रक्रियेसाठी लागणारे लाखो रुपये आणायचे कुठून, या प्रश्नाने चिंतीत असताना आदर्शच्या शस्त्रक्रियेसाठी म्हात्रे यांनी मदतीचा हात पुढे केला. यामुळे या बाळाला नवीन जीवन मिळाले. क्रीडा क्षेत्रात खेळाडूंना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ‘किक बॉक्सरअक्षय गायकवाड या परिस्थितीने गांजलेल्या खेळाडूला कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची वेळ आली होती. मात्र, या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करण्याची जिज्ञासा ठेवणार्‍या अक्षयच्या मदतीसाठी प्रल्हाद म्हात्रे यांनी पुढाकार घेतल्याने अक्षयला अनेक सोयी मिळाल्या.


काश्मिरातील
पुलवामा हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन वीर जवानांचा समावेश आहे. यावेळी म्हात्रे यांनी बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार येथील शहीद नितीन राठोड, तर याच जिल्ह्यातल्या मलकापुरातील संजयसिंह राजपूत या वीर जवानांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन कुटुंबीयांच्या हाती मदत म्हणून प्रत्येकी रोख ५१ हजार रुपये सुपूर्द केले. नुकत्याच जाहीर झालेल्या शालान्त परीक्षेत तब्बल ९८ टक्के गुण मिळवून शहरात प्रथम आलेल्या यश नरेंद्र चौधरी याची शास्त्रज्ञ होण्याची इच्छा आहे. मात्र, घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने पुढील शिक्षणाचा खर्च परवडणारा नव्हता. त्याप्रमाणे गुणवंत यशवंत असणार्‍या यश चौधरी याच्या मदतीला प्रल्हाद म्हात्रे धावून आले असून त्यांनी पुढील दोन वर्षांच्या शिक्षणासाठी लागणार्‍या सर्व खर्चाची जबाबदारी घेतली आहे.


नुकत्याच
पावसाने रूद्रावतार धारण करून सर्वत्र हाहाकार उडवला, तसेच त्यामुळे अनेक कुटुंबे देशोधडीला लागली. यात वनवासी भागातील कुटुंबेही वाचू शकली नाहीत. या कुटुंबीयांना प्रल्हाद म्हात्रे यांच्यासह उद्योगपती विजय भोईर यांनी आर्थिक मदतीसह जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करून त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

कडोंमपा परिवहन उपक्रमातील वाहक-चालकांच्या आर्थिक दयनीय परिस्थितीत मदतीचा हात म्हणून कडोंमपा सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी १५ हजारांची मदत वाहक-चालकांना देऊ केली आहे. म्हात्रे यांच्या कामाचे डोंबिवली शहरातील राजकीय मंडळी तसेच सामाजिक क्षेत्रातून चांगलेच कौतुक केले जात आहे. त्यांच्यामुळे अनेकांना कठीण परिस्थितीत माणुसकीचा हात मिळाला आहे. आपल्या घासातील घास दुसर्‍यांना देण्याचा प्रयत्न करणारे प्रल्हाद म्हात्रे नक्कीच कौतुकास पात्र आहेत.

@@AUTHORINFO_V1@@