संवेदनशीलता भाग-५

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2019
Total Views |

arogy_1  H x W:


संवेदनशीलता वृद्धिंगत झाली अथवा कमी झाली तर शरीर व मनाला वातावरणातील बदलांशी जुळवून घेणे कठीण होते व याचाच परिणाम म्हणून मग रोगाला सुरुवात होते. कमकुवत झालेली संवेदनक्षमता ही रोगाच्या लक्षणांनाही दाबून टाकते व रोगाची लक्षणेही वेळेवर शरीरावर दिसत नाहीत. रोगाला प्रतिकार करण्यासाठी लागणारीशक्तीसुद्धा कमजोर झाल्याने रोग बळावतो व लक्षणे लवकर बाहेर न आल्याने रोगाचे निदान प्राथमिक अवस्थेत करता येत नाही. त्याचबरोबर अशा रुग्णांमध्ये औषधाला प्रतिसाद देण्याची प्रक्रियासुद्धा खालावलेली असल्याने हे रुग्ण औषधोपचारांनासुद्धा उशिरा प्रतिसाद देतात. होमियोपॅथीक औषधे अशावेळी फार उपयुक्त ठरतात. कारण, होमियोपॅथीक औषधांच्या विविध शक्तींच्या मात्रा या संवेदनशीलता अभ्यासून त्यानुसार रुग्णांना दिल्या जातात व त्यामुळे त्यांची (susceptibility) परत ‘नॉर्मल’ होण्यास मदत होते व शरीर व मन लवकर सकारात्मक प्रतिसाद देते. म्हणूनच दुर्धर आजारात जिथे इतर पद्धती थकतात तेथे होमियोपॅथीक उपचार पद्धती फार उपयुक्त ठरते.

रोगाचा प्रादूर्भाव जाणण्यासाठीसुद्धा या संवेदनशीलतेचा फार उपयोग होतो. आजारी माणूस कुठल्या वातावरणात राहतो, त्याचे राहणीमान, सवयी व त्याच्या नेहमीच्या आयुष्यात घडून आलेले बदल इत्यादींचा अभ्यास करून रोग कशा प्रकारे प्रकट करतो आहे, हे जाणले जाते. आपल्याला असे दिसून येते की, साथीचे आजार व कांजण्या, गोवर इत्यादींसारखे संक्रमक आजार हे बालवयातच प्रकर्षाने झालेले दिसून येतात. कारण, लहानवयात मुलांची संवेदनशीलता ही साधारणपणे जास्त असते व त्यावर जनुके व शारीरिक जडणघडण याचाही पगडा असतो.


शरीरातील ही उच्च संवेदनशीलता मग वातावरणातील घटकांना आकृष्ट करते
. त्यामुळे त्यांना लगेच त्यांचा परिणाम जाणवू लागतो. एकदा हे आजार मुलांना झाले की मग ते त्यांचे कार्य करतात. त्यानंतर मात्र शरीर त्या प्रकारच्या रोगाला अनुरूप असे बदल शरीरात घडवून आणते. या अनुरूप बदलांमुळेच मग रोगप्रतिकारक शक्ती (immunity) तयार होते व पुढील आयुष्यात त्या बालकाला कधीही तो आजार होत नाही. या मागे संवेदनशीलतेचा फार महत्त्वाचा वाटा असतो. कारण, शरीर अनुरूपतेने झालेल्या आजारांनुसार शरीरात योग्य ते बदल घडूवन आणते. त्याचमुळे पुन्हा जर त्या विषाणूंचा संसर्ग झाला तर त्या विषाणूंच्या विरुद्ध शरीर अगोदरच तयार असते. त्यामुळे ते शरीराला अपाय करू शकत नाहीत. परंतु, हल्लीच्या काळात काही नको त्या प्रतिबंधात्मक लसी देऊन शरीराची नैसर्गिक संवेदनशीलता दडपून टाकली जाते व त्यामुळे लहान मुलांच्या एकंदरीत रोगप्रतिकार शक्तीवर त्यांचा विपरीत परिणाम होतो.

- डॉ. मंदार पाटकर
@@AUTHORINFO_V1@@