काँग्रेसचे नेते दोन, पण प्रवृत्ती एकच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2019   
Total Views |

datta _1  H x W


काँग्रेसच्या
नेत्यांना दुसर्‍या पक्षाने देशहिताच्या दृष्टीने केलेली चांगली कृती दिसत नाही. त्यांना त्यात वाईटच दिसते. काँग्रेसच्या दोन नेते माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि तिहार कारागृहाची हवा खाऊन आलेले पी. चिदंबरम यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांवरून हे नेते कशाप्रकारे विचार करतात, ते दिसून येते.



काँग्रेसच्या नेत्यांना, आपल्या पक्षाच्या सर्वेसर्वा असलेल्या व्यक्तीने केलेल्या घोडचुकांवर पांघरूण घालण्याची आणि त्या चुकांचे खापर दुसर्‍यांवर फोडण्याची सवय अंगवळणी पडल्याचेच दिसून येते. ‘श्रेष्ठीकाही चूक करणे शक्यच नाही, असे त्या पक्षाच्या भाटगिरी करणार्‍या नेत्यांना वाटत असते. पक्षश्रेष्ठींची खप्पामर्जी ओढवून घेतली तर आपल्याला कोणी विचारणार नाही, याची कल्पना असल्याने त्या नेत्यांकडून खरे बोलण्याचे धाडस होताना दिसत नाही. तसेच काँग्रेसच्या नेत्यांना दुसर्‍या पक्षाने देशहिताच्या दृष्टीने केलेली चांगली कृती दिसत नाही. त्यांना त्यात वाईटच दिसते. काँग्रेसच्या दोन नेते माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि तिहार कारागृहाची हवा खाऊन आलेले पी. चिदंबरम यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांवरून हे नेते कशाप्रकारे विचार करतात, ते दिसून येते.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे अर्थपंडित आहेत, विद्वान आहेत. ते फारसे बोलताना दिसत नाहीत, पण ते बोलतात तेव्हा ते मार्मिक असते, अशी काँग्रेसमधील नेत्यांची धारणा असते. सत्य सांगताना ते कचरत नाहीत, असेही म्हटले जाते. पण, प्रत्यक्षात ते तसे वागत नसल्याचे अलीकडील एका घटनेवरून दिसून आले आहे. ‘पक्षश्रेष्ठींनी केलेल्या चुकांवर पांघरूण घालून त्याचे खापर दुसर्‍या नेत्यावर फोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. अलीकडे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या शताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये डॉ. मनमोहन सिंग यांनी, १९८४ साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये ज्या शीखविरोधी दंगली उसळल्या त्याचे खापर तत्कालीन गृहमंत्री पी. व्ही. नरसिंह राव यांच्यावर फोडले! आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ त्यांनी जी माहिती दिली ती पाहता, राजीव गांधी यांचा यामध्ये काहीच दोष नाही, हे दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसून आले.

त्या कार्यक्रमात बोलताना मनमोहन सिंग म्हणाले की, “इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ज्या दंगली उसळल्या, त्या नियंत्रणात आणण्यासाठी इंद्रकुमार गुजराल यांनी गृहमंत्री नरसिंह राव यांना त्वरित लष्करास पाचारण करावे, असा सल्ला दिला होता.” नरसिंह राव यांनी तो सल्ला ऐकला असता तर एवढी प्रचंड जीवित वा वित्तहानी झाली नसती, असा त्यांच्या बोलण्याचा मथितार्थ! पण, या दंगली ज्या नेत्याच्या वक्तव्यामुळे भडकल्या, त्याबद्दल मनमोहन सिंग यांनी एक चकार शब्दही काढला नाही! “जेव्हा एखादा मोठा वृक्ष कोसळतो तेव्हा जमिनीला हादरे बसणारच,” असे भाष्य करून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी या दंगलींना एक प्रकारे चिथावणीच दिली होती. पण, त्याबद्दल मनमोहन सिंग यांनी सोयीस्कर मौन बाळगले! राजीव गांधी यांच्या त्या वक्तव्यामुळे दंगलीचा वणवा भडकला हे मान्य करण्याची तयारी स्वत:लासत्यवचनीम्हणविणार्‍या या माजी पंतप्रधानांनी दर्शविली नाही. आपण जे काही आहोत ते या नेहरू - गांधी घराण्यामुळे असल्याने त्याविरुद्ध ते कसे काय बोलतील! तत्कालीन गृहमंत्री नरसिंह राव यांना बळीचा बकरा करून राजीव गांधी यांना एकप्रकारेक्लीन चीटदेण्याचाच प्रयत्न त्यांनी केला.

पण, मनमोहन सिंग यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते प्रकाश जावडेकर आणि नरसिंह राव यांचे नातू एन. व्ही. सुभाष यांनी जोरदार टीका केली आहे. पी. व्ही. नरसिंह राव यांनी बघ्याची भूमिका घेता लष्करास पाचारण केले असते, तर दंगल आटोक्यात राहिली असती, असे म्हटले गेले. पण, लष्करास पाचारण करण्याचा अधिकार पंतप्रधानांना असतो आणि त्यासंदर्भात राजीव गांधी यांच्याकडून विलंब झाला ही वस्तुस्थिती मात्र मनमोहन सिंग यांनी लपवून ठेवली. इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर जवळ जवळ २४ तासांनी लष्करास पाचारण करण्याचा निर्णय राजीव गांधी यांनी घेतला होता, हे सत्य मात्र मनमोहन सिंग यांनी दडवून ठेवले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हेच लक्षात आणून दिले. नरसिंह राव यांचे नातू एन. व्ही. सुभाष यांनीही आपल्या आजोबांवर जो दोषारोप करण्यात आला, त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. “मनमोहन सिंग यांनी जे वक्तव्य केले, त्यामुळे राव यांच्या कुटुंबाचा एक सदस्य या नात्याने आपणास अत्यंत वाईट वाटले,” असे एन. व्ही. सुभाष यांनी म्हटले आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेशिवाय गृहमंत्री असा मोठा निर्णय घेऊ शकतात का, असा प्रश्न सुभाष यांनी उपस्थित केला आहे. नरसिंह राव यांचे नातू असलेले सुभाष भाजपचे नेते आहेत. मनमोहन सिंग यांचे वक्तव्य पाहता, अजूनही त्या घटनेबद्दल गांधी परिवारास पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

मनमोहन सिंग यांच्याकडून गांधी-नेहरू परिवारास वाचविण्याचा आणि त्याचे खापर तत्कालीन गृहमंत्री नरसिंह राव यांच्यावर फोडण्याचा कसा प्रयत्न झाला, हे यावरून दिसून येत आहे. मनमोहन सिंग यांना नरसिंह राव हे एवढे दोषी आहेत असे वाटत होते, तर ते पुढे नरसिंह राव मंत्रिमंडळात का सहभागी झाले, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात येत आहे. १९८४ साली दिल्लीमध्ये ज्या शीखविरोधी दंगली उसळल्या, त्या दंगलींना चिथावणी देणारे काही नेते अजूनही मोकाट आहेत हे जनतेला माहीत आहे. त्यांचाबोलविता धनीकोण होता, याचीही सर्वांना कल्पना आहे. असे असताना मनमोहन सिंग यांनी या सर्वांचे खापर नरसिंह राव यांच्या माथी फोडण्याचा जो प्रयत्न केला त्याचे कारण सांगायला हवे का?

चिदंबरम यांना आला पुळका!

काँग्रेसचे अन्य एक नेते पी. चिदंबरम हे तिहार तुरुंगाची हवा खाऊन बाहेर आल्यानंतर त्यांना मोकळा श्वास घेण्यास मिळाला. त्यांची जामिनावर सुटका करण्यात आल्यानंतर या काँग्रेस नेत्यास, काश्मीरमधील ७५ लाख जनतेचा श्वास केंद्र सरकारने तेथे जे निर्बंध लादले आहेत, त्यामुळे कोंडला गेल्याचासाक्षात्कारझाला! काश्मीरसाठीचेकलम ३७०रद्द केल्यानंतर तेथील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी ज्या उपाययोजना केंद्र सरकारने केल्या, त्यामुळे तेथील जनतेच्या स्वातंत्र्यावर घाला घातला असल्याचे भाष्य त्यांनी केले. पण, आतापर्यंतच्या सरकारांना जे जमले नव्हते ते करण्याचे धाडस दाखवून नरेंद्र मोदी सरकारने३७०रद्द केले. ते करताना सरकारच्या निर्णयामुळे आपल्या राजकीय अस्तित्वास धोका निर्माण होईल, असे ज्या नेत्यांना वाटत होते, त्यातील काहींना कारावासात वा नजरकैदेत ठेवले. असे करणे देशहिताच्या दृष्टीने अत्यावश्यक होते. पण, चिदंबरम एवढा विचार कशाला करतील! इंदिरा गांधी यांनी १९७५ साली देशामध्ये आणीबाणी जारी करून संपूर्ण देशालाच तुरुंग बनविले होते. त्यावेळी या स्वातंत्र्याच्या गळचेपीचे स्मरण तुम्हाला झाले होते का? काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद असल्याबद्दल आरडओरड करणारे, काश्मीरमधून जीवाच्या भीतीने ज्या लाखो हिंदूंना तेथून बाहेर पडावे लागले, त्यांच्याबद्दल हे नेते पोटतिडकीने बोलताना दिसतात का? स्वत: चिदंबरम यांनी काश्मिरी पंडितांच्या बाजूने कधी भाष्य केले आहे का? काश्मीरमधील परिस्थिती झपाट्याने पूर्वपदावर येत आहे. त्यासाठी सहकार्य करायचे सोडून असला नतद्रष्टपणा करणे जामिनावर सुटलेल्या चिदंबरम यांनी करणे बरे नव्हे!

मनमोहन सिंग असोत वा चिदंबरम, काँग्रेसच्या या नेत्यांची प्रवृत्ती बदलेल अशी अपेक्षा करावी काय?

@@AUTHORINFO_V1@@