जामसंडेकर हत्याप्रकरणामुळे झाली होती अंडरवल्ड डॉन अरुण गवळीला अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2019
Total Views |
Arun _1  H x W:
 


'डॅडी'ची जन्मठेप कायम!


मुंबई : शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्याप्रकरणी अरुण गवळीला सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली. अरुण गवळीसह अन्य आरोपींवर खटला 'मोक्का' खटला चालवण्यात आला होता. मार्च २००७मध्ये असल्फा व्हिलेज येथे जामसंडेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अरुण गवळीसह ११ जणांना न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे. न्या. धर्माधिकारी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

 

अरुण गवळी सध्या कुठे आहे ?

नागपूर मध्यवर्ती तुरुंगात अरुण गवळी सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या प्रकरणी ही शिक्षा झाली होती. अरुण गवळी याने एकेकाळी मुंबईत आपली दहशत निर्माण केली होती. कुख्यात गुंड, अंडरवर्ल्ड डॉन म्हणून त्याची ओळख होती.

 

नेमके प्रकरण काय ?

कमलाकर जामसंडेकर यांचा सदाशिव सुरवे नामक व्यक्तीशी संपत्तीवरुन वाद होता. अरुण गवळीच्या टोळीतील दोघांनी जामसंडेकर यांची हत्या करण्यास सांगितले. या दोघांनी सदाशिवची गवळीशी भेट घालून दिली. जामसंडेकर यांची सुपारी घेण्यासाठी अरुण गवळीने ३० लाख रुपये मागितले होते. सदाशिव सुपारी देण्यासाठी तयार झाला. त्यानंतर नवे शुटर शोधण्यासाठी प्रताप गोडसे याला दोन नवे शुटर शोधण्यास सांगितले. नवे शुटर शोधण्याचे काम श्रीकृष्ण गुरव याच्याकडे देण्यात आले. त्यानुसार, त्याने नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांची निवड केली. त्यांना प्रत्येकी अडीच लाख रुपये देण्यात आले. २० हजारांची आगाऊ रक्कमही सोपवण्यात आली.

 

१५ दिवस जामसंडेकरांवर होत्या शुटरच्या नजरा

सुपारी दिल्यानंतर विजय कुमार गिरी यांनी अशोक कुमार जायस्वार याच्यासोबत जामसंडेकर यांच्यासह १५ दिवस कमलाकर यांच्यावर लक्ष ठेवले. २ मार्च २००७ रोजी जामसंडेकर यांची राहत्या घरी हत्या केली. एक वर्षानंतर गवळीला अटक करण्यात आली होती. तत्कालीन गुन्हे शाखा प्रमुख राकेश मारिया, अतिरिक्त पोलीस आयुक्त देवेन भारती आणि इतर सहकाऱ्यांनी या प्रकरणाचा छडा लावला होता.

@@AUTHORINFO_V1@@