आज ठरणार कर्नाटकचे भवितव्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0


नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेच्या १५ मतदारसंघामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीचा सोमवारी निकाल जाहीर होणार आहे. आजच्या पोटनिवडणुकीच्या निकालावर येडियुरप्पा सरकारचे भवितव्य ठरवणार आहे. काँग्रेस पक्षाची नजर देखील आजच्या निकालावर असणार आहे. कर्नाटक विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष आर. के. रमेश कुमार यांनी १७ आमदारांना अपात्र ठरवले होते. त्यानंतर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

 

सर्वोच्च न्यायालयाने ते आमदार पोटनिवडणूक लढू शकतात, असा निर्णय दिल्यानंतर त्या सर्व आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या सर्व आमदारांनी भाजपकडून निवडणूक लढवली आहे. भाजपला येथे सत्ता राखण्यासाठी १५ जागे पैकी ६ जागा जिंकण्याची गरज आहे. गुरुवार, ५ डिसेंबर रोजी या पोटनिवडणुकीत ६७.९१ टक्के मतदान झाले होते.

@@AUTHORINFO_V1@@