मंगल प्रभात लोढा ठरले देशातील सर्वाधिक श्रीमंत बांधकाम व्यावसायिक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2019
Total Views |
Lodha _1  H x W


ग्रोहे हुरुन इंडियातर्फे श्रीमंत व्यावसायिकांची यादी जाहीर



मुंबई : मॅक्रोटेक डेव्हलपर्सचे संस्थापक मंगल प्रभात लोढा हे देशातील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यवसायिक ठरले आहेत. लोढा समुहाचे एकूण निव्वळ नफा ३१ हजार ९३० कोटी इतके आहे. देशातील शंभर सर्वाधिक श्रीमंत बांधकाम व्यावसायिकांची यादी प्रकाशित करणाऱ्या ग्रोहे हुरुन इंडियातर्फे ही माहिती देण्यात आली आहे. गतवर्षीही लोढा समुहाने या यादीत अव्वल क्रमांक मिळवला होता. सलग दोन वर्षे लोढा समुहाने आपले स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे.

 

डीएलएफ समुहाचे उपाध्यक्ष राजीव सिंह हे २५ हजार ८० कोटींच्या निव्वळ नफ्यासह दुसरे स्थान पटकावले आहे. त्यांनी आपल्या गुणतालिकेत एका अंकाने सुधार केला. तिसऱ्या स्थानी बंगळुरुतील एम्बसी समुहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र विरवानी आहेत. त्यांचे निव्वळ उत्पन्न २४ हजार ७५० कोटी इतके आहे.

 

रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांचे एकूण उत्पन्न २ लाख ७७ कोटी इतके आहे. सर्वात श्रीमंत समुहांपैकी ७५ टक्के बांधकाम व्यावसायिक हे मुंबई, दिल्ली आणि बंगळूरू या तीन शहरांतील आहेत. त्यातील ५९ टक्के व्यवसायिक हे पारंपारिक आहेत. यंदाच्या वर्षातील सहा बांधकाम समुहांची विक्री ही २ हजार कोटींपेक्षा जास्त आहे. तर एक हजार कोटींची विक्री असणारे २० बांधकाम व्यावसायिक आहेत. लोढा समुहाचे ३१ मार्च २०१९ पर्यंत ४० प्रकल्प कार्यरत आहेत.



नाव, कंपनी, शहर

नफा 
(कोटींमध्ये)

मंगल प्रभात लोढा अॅण्ड फॅमिली, मैक्रोटेक डेवलपर्स (मुंबई)

३१,९६०

राजीव सिंह, डीएलएफ (दिल्ली)

२५,०८०

जितेंद्र विरवानी, एम्बेसी (बंगळुरू)

२४,७५०

निरंजन हीरानंदानी, हीरानंदानी कम्युनिटीज (मुंबई)

१७,०३०

चंद्रू रहेजा अॅण्ड फैमिली, के रहेजा (मुंबई)

१५,४८०

विकास ओबेरॉय, ऑबेरॉय रियलिटी (मुंबई)

१३,९१०

राजा बागमाने, बागमाने डेवलपर्स (बंगळुरू)

,९६०

सुरेंद्र हीरानंदानी, हाऊस ऑफ हीरानंदानी (मुंबई)

,७२०

सुभाष रुनवाल अॅण्ड फैमिली, रुनवाल डेवलपर्स (मुंबई)

,१००

अजय पीरामल अॅण्ड फैमिली, पीरामल रियलिटी (मुंबई)

,५६०

@@AUTHORINFO_V1@@