हैदराबाद एन्काऊंटर चौकशी प्रकरणाची धुरा 'या' मराठी माणसाकडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : पशुवैद्यकीय डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये हैदराबाद पोलिसांनी ४ आरोपींचा काही दिवसांपूर्वी एनकाऊंटर केला. याप्रकरणी काही जणांनी पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले तर काहींनी हे कायद्याच्या बाहेर असल्याचे सांगत आरोप केले. आता या प्रकरणाच्या तपासासाठी तेलंगाणा सरकारने विशेष पथकाची (एसआयटी) नेमणूक केली आहे. ८ सदस्यांच्या या पथकाचे नेतृत्व मराठमोळे पोलीस अधिकारी महेश भागवत यांच्यावर सोपविण्यात आली आहे. भागवत यांच्या नेतृत्वाखाली हे पथक सायबराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटर प्रकरणाचा तपास करुन सविस्तर अहवाल सादर करणार आहेत.

 

कोण आहेत महेश भागवत?

 

महेश भागवत हे रचाकोंडाचे पोलीस आयुक्त पदावर कार्यरत आहेत. तेलंगाणा सरकारने २०१४ साली 'शी टीम्स' नावाने एक सिस्टीम सुरू केली. महेश भागवत यांनी रच्चाकोंडा या नवीन आयुक्तालयाचा २०१६ मध्ये ताबा घेतला. त्यानंतर त्यांनी 'शी टीम्स' च्या प्रभावी अंमलबजावणीस सुरुवात केली. मुली, महिलांना सुरक्षा मिळावी म्हणून त्यांनी उल्लेखनीय उपक्रम सुरू केला आहे. त्या माध्यमातून महिला सुरक्षेसाठी त्यांचे पोलीस पथक काम करते. महेश भागवत यांचे मानव तस्करी विरोधातही मोठे कार्य आहे. तसेच त्यांनी बाल मजुरीविरोधातही कारवाया करत अनेक बाल कामगारांची सुटका केली आहे. त्यानंतर आता त्यांच्या नेतृत्वात एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी होणार आहे.

 

काय आहे प्रकरण?

 

२७ नोव्हेंबरला हैदराबादमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर दिशा (नाव बदलेले) यांचा बलात्कार करून हत्या करण्यात आली. अवघ्या काही तासांमध्ये ४ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांनी पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला. त्यानंतर अवघ्या १० दिवसांमध्ये त्या आरोपींचा एनकाऊंटर करण्यात आला. देशभरातून त्यांचे कौतुक होऊ लागले. परंतु, हा एनकाऊंटर कायद्याबाहेर असल्याचे सांगून पोलिसांविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.

@@AUTHORINFO_V1@@