अजूनही कर भरला नाही? हे नक्की वाचा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0

 


मुंबई : आयकर विभागाकडून आयकर रिटर्न सादर करण्यासाठी ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. ३१ डिसेंबरनंतर आयकर रिटर्न सादर केल्यास करदात्यांना दुप्पट म्हणजेच १० हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. करदात्यांना कपन्यांकडून फॉर्म १६ मिळण्यात उशीर आणि तांत्रिक अडचणींमुळे रिटर्न फायलिंगची मुदतवाढ करण्यात आली होती.

 

आयकर अधिनियम १९६१च्या 'कलम २३४ एफ' नुसार ३१ डिसेंबरपर्यंत रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्याला ५ हजार रुपयांचा दंड आणि त्यानंतर रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांना १० हजारांचा दंड लावला जाणार आहे. ज्या करदात्यांचे वार्षिक उत्पन्न ५ लाखांपर्यंत आहे, अशा करदात्यांना विलंब शुल्क म्हणून १ हजारांचा दंड भरावा लागणार आहे. याव्यतिरिक्त ज्या करदात्यांचे वार्षिक उत्पन्न कर वजावटीचा लाभ घेतल्यानंतर करमुक्त असेल तर त्यांना रिटर्न फायलिंग करता दंड भरावा लागणार नाही.

@@AUTHORINFO_V1@@