जेएनयूचे प्राध्यापक अतुल जोहरी यांच्यावर विद्यार्थ्यांचा हल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2019
Total Views |
jnu_1  H x W: 0


नवी दिल्ली
(विशेष प्रतिनिधी) : सतत वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांनी प्राध्यापक अतुल जोहरी यांच्यावर हल्ला केल्याची गंभीर घटना सोमवारी घडली. 

जेएनयूतील प्राध्यपकांची एक संघटना- जेएनयू टीचर्स फेडरेशन तर्फे आज विद्यापीठ परिसरात एकदिवसीय सद्भावना धरणे आंदोलन करण्यात आले. सायंकाळी सद्भावना मार्च काढून आंदोलनाची सांगता झाली. मात्र
, आंदोलनस्थळी जेएनयू स्टुडंट युनियन (जेएनयूएसयू) आणि जेएनयू टीचर्स असोसिएशन (जेएनयूटीए) या प्राध्यापकांच्या अन्य एका संघटनेने आंदोलनकर्त्या प्राध्यापकांवर हल्ला केल्याची आणि पाठलाग करीत धक्काबुक्की केल्याची गंभीर घटना घडली. 




प्राध्यापक अतुल जोहरी हे आक्रमक विद्यार्थ्यांपासून आपला जीव वाचवत पळत असल्याचे व विद्यार्थी त्यांचा पाठलाग करीत असल्याचे व्हीडिओमध्ये कैद झाले आहे. अतुल जोहरी कँपस छोडो अशा घोषणाही यावेळी विद्यार्थी देत होते.

आंदोलनकर्त्या प्राध्यापकांनी विद्यापीठ प्रशासनाकडे सेमीस्टर परिक्षा शांततापूर्ण वातावरणात व्हाव्यात, यासाठी सहाय्य करण्याची मागणी केली. देशाच्या अर्थसंकल्पाच्या किमान १० टक्के वाटा शिक्षण क्षेत्रासाठी खर्च करण्यात यावा, अशीही मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली.

@@AUTHORINFO_V1@@