आकार घेई तिरस्कार हा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2019
Total Views |

aarogya_1  H x



अलीकडेच हैदराबादला घडलेल्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये आपण जवळजवळ पूर्ण देशात सगळ्यांच्या मनात पुरेपूर ठासून भरलेली तिरस्काराची भावना पाहिली. त्याच भावनेतून पोलिसांकडून मारल्या गेलेल्या आरोपींच्या मृत्यूनंतर आनंदाचा व्यापक जल्लोषही पाहिला. सामाजिक भावनेतून तिरस्काराचा हा जल्लोष पाहावयास गेले तर तो तसा योग्य आहे का नाही, हा प्रश्न पुन्हा भावनिक पातळीवर उभा राहतोच. पण, त्या जल्लोषाततिरस्काराचा आणिघृणेचा नकारात्मक आविष्कार आहे, हे निश्चित.

आजच्या वर्तमान परिस्थितीत आपल्याला आपल्या अवतीभोवती तिरस्काराचे वातावरण पसरलेले दिसते. अशा वातावरणात सामाजिकदृष्ट्या आपण कसे वागायचे वा काय प्रतिसाद द्यायचा, हे बरेचदा आपल्याला समजत नाही. खरेतर आपल्याला असुरक्षित वाटायला लागले आहे, हे सगळं वाटण्यामागे बाह्य वातावरणातील भयानक परिस्थितीपेक्षा आपल्या मनात येणार्‍या प्रखर भावना अधिक कारणीभूत आहेत, असे वाटल्यास अविवेकी ठरणार नाही. ‘तिरस्कारही इतकी तीव्र भावना आहे की, जेव्हा आपण वाईट गोष्टी करणार्‍या वाईट व्यक्तीचा विचार करतो, तेव्हा त्या माणसाचे वाईट व्हावे, हा विचार मनात सतत येत राहतो आणि बर्‍याचवेळा हा विचार विनासायास आणि सहज येतो. म्हणजेच आपल्या मनात एखाद्या वाईट व्यक्तीबद्दल तिरस्काराची द्वेषाची ही भावना सुलभपणे येते. आपल्याला एखाद्याने हेतूपूर्वक दुखावलेले असेल वा एखाद्या व्यक्तीवर आपण अमाप प्रेम केले, पण त्या व्यक्तीने आपला विश्वासघात केला असेल तर वा कोणी आपल्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली असेल, तर तिरस्काराची भावना आपल्या मनात तांडव नृत्यच करते. आपल्या भावविश्वात भरपूर सकारात्मक भावनांबरोबर कडवट नकारात्मक भावना निवास करत असतात. पण, नकारात्मक भावनांमध्ये तिरस्काराची वा द्वेषाची भावना यात कुप्रसिद्ध आहेत.

कोणीही व्यक्ती आपल्या मनात खूप तिरस्कार आहे, असं शांतपणे सांगत नाही. या भावनेबरोबर शारीरिक आणि मानसिक भावही प्रचंड तीव्रतेने लोक व्यक्त करतात. किंबहुना, त्याच्या नकळत ते भाव व्यक्त होताना आपण पाहतो. पाहाणार्‍यालाही एखाद्या माणसाच्या मनात तिरस्काराचे इतके विखारी भाव कसे असू शकतात, याचा धक्काच बसतो.

आपल्याला एखाद्या माणसाबद्दल राग येतो, तेव्हा बहुधा त्याच्या अमूक कृतीबद्दल तो मर्यादित असतो. त्याने असे का केले वा त्याला असे करायचे धाडसच कसे झाले, अशा संकल्पनेवर आपल्याला दुसर्‍या माणसाबद्दल क्रोध येतो. अगदी याच्याविरुद्धतिरस्कारहा एखाद्या व्यक्तीच्या अमूक कृतीपुरता मर्यादित राहता, तो त्या व्यक्तीविरोधात असतो. ती व्यक्तीच वाईट आहे तिचीनियत खराब आहे, असे भाव त्या व्यक्तीबद्दलच्या द्वेषभावनेतून व्यक्त होतात. याच्यामागे ती व्यक्ती जणू जन्मापासूनच नीच आहे, असे भाव असल्यामुळे अशी व्यक्ती भविष्यात बदलणे शक्यच नाही, असे अभिप्रेत असतेच. हा जोपरमनंटप्रकारचानीच माणूसहा विश्वास एखाद्याबद्दल व्यक्तीच्या मनात येतो, तेव्हा सामान्यतः तो एखाद्या दुसर्‍या घटनेमुळे येत नाही, तर त्या व्यक्तीच्या वागणुकीची जीस्टाईलअसते, त्यामुळे तो येत असतो.

साहजिकच
अशा व्यक्तीची नीच पातळीवर वागण्याची पद्धत कायमस्वरूपी असल्याचे गृहित धरल्यामुळे त्या व्यक्तीबद्दल इतरांना जराही सहानुभूती नसते. आपण अशा व्यक्तींबरोबर तडजोड करावी, असेही लोकांना वाटत नाही. बर्‍याचदा लोकांना तिरस्कार वाटल्यामुळे बर्‍याच हिंसक भावनांचा उद्रेक झालेला आपण पाहतो. अलीकडेच हैदराबादला घडलेल्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये आपण जवळजवळ पूर्ण देशात सगळ्यांच्या मनात पुरेपूर ठासून भरलेली तिरस्काराची भावना पाहिली. त्याच भावनेतून पोलिसांकडून मारल्या गेलेल्या आरोपींच्या मृत्यूनंतर आनंदाचा व्यापक जल्लोषही पाहिला. सामाजिक भावनेतून तिरस्काराचा हा जल्लोष पाहावयास गेले तर तो तसा योग्य आहे का नाही, हा प्रश्न पुन्हा भावनिक पातळीवर उभा राहतोच. पण, त्या जल्लोषाततिरस्काराचा आणिघृणेचा नकारात्मक आविष्कार आहे, हे निश्चित. आपण आपल्या शत्रूचा सामान्यत: तिरस्कार करतोच; तेच करण्यात आपल्याला आनंदही वाटतो. कधी कधी आपणही छोट्या-मोठ्या चुकीच्या गोष्टी करत असतो. त्या कधी अनैतिकही असतात. अशावेळी दुसर्‍याचा तिरस्कार करताना कुठेतरी आपण आपल्यास मनातील अपराधीपणाच्या भावनेतून मुक्त होऊ इच्छीत असतो.

अर्थात, ‘तिरस्कारवाद्वेषया शब्दांचा फुगा आपण कधी कधी थोडा जास्तच फुगवतो. एखादा रंग, एखादे गाणे, एखादा पदार्थ वा एखादा परफ्युम याचा आपण ठामपण तिरस्कार करतो, असे म्हणतो, तेव्हा खरे पाहता त्या गोष्टी आपल्याला आवडत नसतात. तेव्हातिरस्कार’, ‘घृणाद्वेषया शब्दांचे भावनेचे विवेचन अधिक गंभीरपणे समजून घेणे आवश्यक आहे.

डॉ. शुभांगी पारकर
@@AUTHORINFO_V1@@