महिनाभराच्या उपचारानंतर लता मंगेशकर परतल्या घरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2019
Total Views |
Lata mangeshkar _1 &
 
 

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर गेल्या महिनाभरापासून मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू होते. २८ दिवसांनंतर त्यांना सुट्टी देण्यात आली असून त्या आता घरी परतल्या आहेत. लता मंगेशकर यांनी स्वतःच ट्विटरवरून ही माहिती दिली. शिवाय सर्व चाहत्यांचे आभारही मानले आहेत. तत्पूर्वी १२ नोव्हेंबरला लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली लतादीदींवर उपचार सुरू होते.

 

रविवारी लता मंगेशकर यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. लता मंगेशकर यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या, ‘नमस्कार. गेल्या २८ दिवसांपासून मी ब्रीच कॅण्डी रूग्णालयामध्ये होते. मला न्यूमोनिया झाला होता. मी प्रकृती पूर्णपणे ठीक झाल्यानंतरच घरी जावे, अशी डॉक्टरांची इच्छा होती. आज मी घरी आले आहे. ईश्वर, आईवडिलांचे आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांचे प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी आता ठीक आहे. मी तुम्हा सगळ्यांची मनापासून आभारी आहे. ब्रीच कॅण्डीमधील डॉक्टर खरेच देवदूत आहेत. तेथील सर्व कर्मचारी खूपच चांगले आहेत. तुम्हा सगळ्यांची मी पुन्हा मनापासून आभारी आहे. हे प्रेम आणि आशीर्वाद असाच रहावा,’ असे ट्विट लता मंगेशकर यांनी केले आहे.

 

लता मंगेशकर यांनी उपचार करणार्‍या सर्व डॉक्टरांचेही आभार मानले आहेत. माझ्यावर काळजीपूर्वक आणि प्रेमाने उपचार करणार्‍या डॉक्टरांचे आभार. डॉ. प्रतीत समधानी, डॉ. आश्विनी मेहता, डॉ. झरीर उदवाडीया, डॉ. निशित शाह, डॉ. जनार्दन निंबाळकर आणि डॉ. राजीव शर्मा या डॉक्टरांविषयी लता मंगेशकरांनी आभार व्यक्त केले आहेत.

@@AUTHORINFO_V1@@