बहुचर्चित नागरिकत्व दुरुस्ती विधेयक उद्या लोकसभेत होणार सादर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2019
Total Views |


loksabha_1  H x


नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अमित शाह सोमवारी लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक सादर करतील. या विधेयकानुसार पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान या देशांतील धार्मिक छळ किंवा अत्याचारग्रस्त गैर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. सोमवारी लोकसभेत होणाऱ्या कामकाजाच्या यादीनुसार गृहमंत्री अमित शाह दुपारी हे विधेयक लोकसभेत मांडतील.

 

जुन्या नागरिकत्व कायद्यात सुधारणा करण्याची तरतूद आहे. प्रस्ताव मांडल्यानंतर या विधेयकावर चर्चा होऊन ते मंजूर केले जाईल. या विधेयकामुळे ईशान्य भारतातील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत आणि मोठ्या संख्येने लोक आणि संस्था या विधेयकाला विरोध करीत आहेत. निषेध करणार्‍यांचे म्हणणे आहे की, यामुळे आसाम करार १९८५ मधील तरतुदी रद्द केल्या जातील, ज्यात धार्मिक भेदभाव न करता बेकायदेशीर निर्वासितांच्या मायदेशी परतण्याची अंतिम तारीख २४ मार्च १९७१ निश्चित करण्यात आली होती.


नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक
, २०१९ (सीएबी) नुसार पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानात धार्मिक छळामुळे ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समाजातील लोकांना बेकायदेशीर निर्वासित मानले जाणार नाही तर त्याऐवजी त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल.

@@AUTHORINFO_V1@@