राज्यातील सत्तास्थापनेचा वचपा पालिकेत निघणार !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2019
Total Views |
MCGM _1  H x W:


मुंबई : २०२२च्या मुंबई महानगरपालिका निवणुकांमध्ये शिवसेनेला आव्हान देण्याची तयारी भारतीय जनता पक्षाने चांगलीच व्युहरचना आखली आहे. त्यासंबंधित महत्वपूर्ण बैठक रविवारी मुंबईत होती. याबाबत माहिती देताना आमदार ऍड. आशिष शेलार म्हणाले की, "भाजप हा मुंबईतील मोठा पक्ष आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजपने तयारी सुरु केली आहे. मुंबईतील आजच्या बैठकीत २२७ वार्डनिहाय्य चर्चा होत आहे. तसेच संगतनात्मक नवीन नियुक्त्यांबाबतही या बैठकीत विचार करण्यात येणार आहे." अशी माहिती त्यांनी दिली. भाजपच्या या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.

 

मुंबई महापालिकेतील शिवसेनेचा किल्ला भेदण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. पालिका निवडणूकांमध्ये शिवसेनेसमोर मोठे आव्हान तयार करण्याची जबाबदारी भाजपने घेतली आहे. त्यानुसार, आमदार आशिष शेलार आणि विनोद तावडे यांच्या नेतृत्वात ही बैठक घेण्यात आली. यापूर्वीही महापौरपदाच्या निवडणूकीवेळी भाजपने आपला उमेदवार मागे घेतला होता. पुढील महापौर आमचाच असेल, असे सुतोवाच शेलार यांनी यावेळी केले होते. त्याप्रमाणे भाजपने आपले ध्येय निश्चित केले आहे. त्यानुसार येत्या काळात वॉर्डनिहाय्य अध्यक्ष व ३६ विधानसभा मतदार संघ अध्यक्ष तसेच सहा लोकसभा मतदार संघ प्रमुख आणि जिल्हाध्यक्ष यांच्या नियुक्त्या व फेरनियुक्त्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या पालिका निवडणूकीत आता शिवसेनेची थेट लढत आता भाजपशीच असणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@