नाशिकचा जागतिक नृत्याविष्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2019   
Total Views |


nashik_1  H x W


पॅट्रिक व आजपर्यंत १४ वेळा अशा नृत्योत्सवाचे आयोजन नाशिकमध्ये करण्यात आले असून त्यात नामवंत भारतीय कलाकारांसोबतच जेनेव्हिएव ग्लेझ (मार्सेल, फ्रान्स) पॉलीन रेबेल (स्वीडन) ईसाबेल ना (पॅरिस, फ्रान्स) आणि साराह गासेर (झुरीच, स्विझर्लंड) या युरोपियन कलाकारांनी अनुक्रमे भरतनाट्यम, कथ्थक आणि ओडिसी या प्रकारचे सादरीकरण केले असून त्यास रसिक वर्गाची दाद देखील मिळाली आहे.


भारताची सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यात आणि ती वृद्धिंगत करण्यात नाशिकचा वाटादेखील मोठा आहे
. त्यामुळे जगातील अनेकविध देशांचे नाशिक हे कला-क्रीडा क्षेत्राचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. ‘मंत्रभूमी’ ते ‘यंत्रभूमी’ असा प्रवास साकारल्यानंतर नृत्याविष्काराच्या माध्यमातून युरोपियन देशांशी आपले संबंध वृद्धिंगत करण्यासाठी नाशिक शहर आगामी काळात मोलाची भूमिका बजाविणार आहे. कारण, लवकरच नाशिकमध्ये भारत-युरोप नृत्योत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. येथील विख्यात अशा शिवालय नृत्य कलामंदिर, भारत युरोप मंडळ आणि विश्व शैक्षणिक सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे लवकरच भारत-युरोप नृत्योत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दीपक मगरे आणि महासचिव माधव अण्णा गाडगीळ यांनी सांगितले की, “गेल्या २० वर्षांपासून या मंडळातर्फे नाशिक व


युरोपातील महत्त्वाच्या शहरात अशा प्रकारच्या नृत्योत्सवाचे आयोजन होत असते. त्यात सुप्रसिद्ध भारतीय व युरोपियन कलाकार भारतीय शास्त्रीय नृत्याचे सादरी करत असतात. नाशिकमध्ये होणार्‍या या नृत्योत्सवाचे हे १५ वे पुष्प असणार आहे. पॅट्रिक व आजपर्यंत १४ वेळा अशा नृत्योत्सवाचे आयोजन नाशिकमध्ये करण्यात आले असून त्यात नामवंत भारतीय कलाकारांसोबतच जेनेव्हिएव ग्लेझ (मार्सेल, फ्रान्स) पॉलीन रेबेल (स्वीडन) ईसाबेल ना (पॅरिस, फ्रान्स) आणि साराह गासेर (झुरीच, स्विझर्लंड) या युरोपियन कलाकारांनी अनुक्रमे भरतनाट्यम , कथ्थक आणि ओडिसी या प्रकारचे सादरीकरण केले असून त्यास रसिक वर्गाची दाददेखील मिळाली आहे.” भारत-युरोप नृत्योत्सवाच्या १४व्या पुष्पात जर्मनीच्या हॅम्बूर्ग शहरातील मादाम कटजा या भरतनाट्यम तर पॅरिसच्या ईसाबेल ना या कथ्थक नृत्य सादर करणार आहेत. या दोन्हीही युरोपियन कलाकार गेल्या २५ वर्षांपासून भारतीय शास्त्रीय नृत्यसाधना करत असून भारत आणि जगातील प्रमुख देशात त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. अनेक प्रतिष्ठीत अशा जागतिक महोत्सवात ‘शिवालय नृत्यकला मंदिरा’च्या कसलेल्या कलाकारांसोबत त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत.



या मंडळाचा जागतिक स्तरांवर भारतीय कला व सांस्कृतिक प्रसार व प्रचाराच्या कार्यात हिरीरीने सहभाग आहे
. त्यामुळे युरोपातील अनेक विद्यार्थ्यांनी व युरोपियन क्लासिकल बॅलेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी मंडळांच्या युरोपातील नृत्य कार्यशाळांच्या दरम्यान भारतीय नृत्यकला आत्मसात केलेली आहे. याचा इतका परिणाम झाला आहे की, युरोपियन कलाकारांनी आपली नावे भारतीयसुद्धा ठेवलेली आहेत. अगदी पंचांग व मुहूर्त आणि राशींनुसार ही नावे ठेवली आहेत. उदा. जेनेव्हिएव यांनी निर्मला, साराह यांनी संगीता, तर कटजा यांनी शिवानी ही भारतीय नावे धारण केलेली आहेत. भारतीय शास्त्रीय नृत्यसाधना अनेक वर्षांपासून करत असलेले व त्यात प्रावीण्य मिळवलेले अन्य युरोपियन कलाकारांचेही कला सादरीकरण भविष्यात होणार आहे. त्यात टोलीए तुला, भरतनाट्यम (पॅरिस) सोफीया सालीग्रोस, (भरतनाट्यम, बेल्जियम) फॅनि मार्केतस उर्फ मीरा आणि प्रिस्सीला (कथ्थक, स्विझर्लंड) ल्युकेसीया मनिसकोटी (भरतनाट्यम, इटली) यांचा प्रामुख्याने समावेश आहे.




‘शिवालय नृत्यकला मंदिर’ व भारत-युरोप सांस्कृतिक मंडळातर्फे अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय नृत्योत्सवाची मेजवानी आयोजित करण्यात येत आहे. युरोप आणि भारत यांचे विविध पातळीवर वृद्धिंगत होणारे संबंध यास नृत्यकलेच्या माध्यमातून बळ मिळणे हे आंतरराष्ट्रीय संबंधांच्या दृष्टिकोनातून निश्चितच महत्त्वाचे आहे. तसेच, युरोपातील नृत्यकलाकारांनी भारतीय पंचाग, राशी यांचा अभ्यास करून भारतीय नावे धारण करणे हे भारतासाठी निश्चितच गौरवास्पद असेच आहे. नटराजाच्या सेवेतून निर्माण होणारे नाते हे आगामी कळात निश्चितच शाश्वत स्वरूपाचे असण्याची दाट शक्यता अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून निर्माण होत आहे. तसेच, युरोपियन देशांमध्ये भारतीय संस्कृतीचे आदान प्रदान होण्यासाठी आणि भारतीय संस्कृतीची महती वृद्धिंगत होण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम निश्चितच मोलाची भूमिका बजावतील, यात शंका नाही.

@@AUTHORINFO_V1@@