आंगणेवाडी जत्रेची तारीख ठरली हो SSS !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2019
Total Views |
Anganewadi Mandir _1 



कणकवली : कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीतील श्री भराडी देवीच्या जत्रेची तारीख निश्चित करण्यात आली आहे. प्रथेनुसार पारध आणि देवीने दिलेल्या कौलानुसार श्री भराडी देवीचा जत्रोत्सव यंदा १७ फेब्रुवारी २०२० रोजी होणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. दक्षिण कोकणातील काशी म्हणूनही प्रसिद्ध असलेल्या भराडी देवीची दरवर्षी देवीने दिलेल्या कौलानुसार जत्रा भरते. यंदाही प्रथेप्रमाणे पारध झाली. त्यानंतर देवीने दिलेल्या कौलानुसार या वर्षीची जत्रा फेब्रुवारीच्या १७ तारखेला होणार आहे.

 

आंगणेवाडीच्या जत्रेला प्रामुख्याने असंख्य चाकरमानी येतात. मुंबईतून मोठ्या संख्येने भाविक दरवर्षी हजेरी लावतात. अनेक क्षेत्रातील प्रतिष्ठीत मंडळी कलाकार या दीड दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवाला उपस्थित असतात. दरवर्षी किमान दहा लाख भाविक या यात्रेला उपस्थित असतात. ही यात्रा सुरळीत व्हावी यासाठी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ व मुंबई मंडळाचे एकूण दीडशे कार्यकर्ते तैनात असतात. प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थांच्या पाच ते सहा बैठका यात्रेच्या नियोजनासाठी होणार आहेत.

@@AUTHORINFO_V1@@