दिल्ली निर्भया प्रकरणातील आरोपीची दयेची याचिका मागे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2019
Total Views |


nirbhaya_1  H x



नवी दिल्ली
: दिल्ली निर्भया प्रकरणात आरोपी म्हणून शिक्षा झालेला आरोपी विनय शर्मा याने शनिवारी राष्ट्रपतींकडे याचिका पाठविली असून गृहमंत्रालयाने राष्ट्रपतींना पाठविलेली 'दया याचिका' तातडीने परत करावी अशी विनंती केली आहे. विनय शर्मा याने आपल्या नुकत्याच पाठविलेल्या याचिकेत म्हटले आहे की, "गृहमंत्रालयाने राष्ट्रपतींना पाठविलेली दया याचिकेवर माझी स्वाक्षरी नसल्याने ती अधिकृत नाही, म्हणून ती याचिका राष्ट्रपतींनी ते परत करावी." एका वृत्तसंस्थेने याबाबत खुलासा केल्याने एकच खळबळ उडाली आहे.



निर्भया प्रकरणात न्यायालयाने सर्वच आरोपींना फाशीची शिक्षा झाली आहे. यातील आरोपी विनय शर्मा याने राष्ट्रपतींना गुरुवारी गृहमंत्रालयाद्वारे दयेची याचिका पाठवली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कालच एका भाषणादरम्यान म्हणाले
,"मुळात बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीना दयेची याचिका करण्याचा अधिकार असूच नये." 'पोस्को' कायद्याअंतर्गत अल्पवयीन गुन्हे दाखल झालेल्या म्हणजेच अल्पवयीन तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना दयेची याचना नको, याबाबत पुनर्विचार करण्यात यावा असेही राष्ट्रपती यावेळी म्हणाले.



गृहमंत्रालयाने दया याचिका फेटाळण्यासाठी शिफारस पाठविली

गृह मंत्रालयाने निर्भया घटनेत दोषी ठरलेल्या विनय शर्माची दया याचिका फेटाळून लावण्याची शिफारस राष्ट्रपतींना आधीच केली होती. अंतिम निर्णयासाठी गृह मंत्रालयाने शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दया याचिका दाखल केली. दोन दिवसांपूर्वी दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल यांनीही गृहमंत्रालयाला एक अहवाल पाठविला होता, असे सांगून दोषीची शिक्षा कोणत्याही परिस्थितीत काढता येणार नाही. दिल्ली सरकारनेही विनयची याचिका फेटाळली.

@@AUTHORINFO_V1@@