अखेर नाट्यगृहांमध्ये आता बसवणार जॅमर !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


मुंबई : गेले अनेक महिन्यांपासून नाट्यगृहांमध्ये होणाऱ्या मोबाईलच्या वापरामुळे नाटक क्षेत्रामध्ये टीकांचा ओघ सुरु आहे. अनेक ज्येष्ठ कलावंतांनी नाटक चालू असताना मोबाईलच्या वापरामुळे सादरीकरणामध्ये येणारा व्यत्यय यामुळे अनेकांनी उघडपणे नाराजी दर्शविली होती. अखेर यावर आता तोडगा काढण्याची तयारी मुंबई महानगरपालिकेने दर्शविली आहे. आता नाट्यगृहांमध्ये मोबाईल जॅमर बसवण्यात येणार आहेत.

 

सुबोध भावे, सुमित राघवन, विक्रम गोखले, भरत जाधव, जितेंद्र जोशी आणि प्रशांत दामले अशा अनेक बड्या कलाकारांनी नाटक चालू असताना होणाऱ्या मोबाईलच्या वापरावर वेळोवेळी टीका केली आहे. अनेक माध्यमांमधून हा प्रकार टाळण्याचे आव्हानदेखील या कलाकारांकडून करण्यात आले आहे. तसेच, मोबाईल फोनचा वापर टाळण्यासाठी जॅमर बसवण्याची मागणी होत होती. ही मागणी महापालिका प्रशासनाने मान्य करत महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

 

महापालिकेकडून बसवण्यात येणाऱ्या जॅमरची सुविधा संबंधित नाट्यनिर्माता, संस्था तसेच आयोजक यांच्याकडून लेखी स्वरुपात मागणी केल्यास प्रशासनाच्या मंजूर अटी व शर्तींनुसार उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच ही जॅमर यंत्रणा बसवल्यानंतर आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधितांची राहील. सुबोध भावे आणि सुमित राघवन यांच्याशिवाय अनेक अभिनेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@