राजकीय मतभेद विसरून मुख्यमंत्र्यांनी केले पंतप्रधानांचे स्वागत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2019
Total Views |


s_1  H x W: 0 x

 


पुणे : विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करून सत्तास्थापन केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले, तर भाजप हे विरोधी पक्षामध्ये बसले. हे सर्व राजकीय नाट्य विसरून शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळावर स्वागत केले..

 
 
 

पोलिस महासंचालकांच्या राष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदी शुक्रवारी रात्री पुण्यात दाखल झाले. मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले.

 
 
 
या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही उपस्थिती होते.
 
 
 
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीनंतर भाजप - शिवसेनेत सत्तास्पर्धेतून निर्माण झालेले राजकीय वितुष्ट राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींचे कारण ठरले. म्हणूनच मोदींच्या या दौऱ्यात राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींच्या केलेल्या स्वागताला वेगळे राजकीय महत्त्व निर्माण झाले आहे.
@@AUTHORINFO_V1@@