ब्रेकिंग ! हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0

 


नवी दिल्ली : हैदराबादमधील पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकारांतील चारही आरोपींचा शुक्रवारी पहाटे एन्काऊंटर करण्यात आला. या आरोपींची नावे मोहम्मद, आरिफ, नवीन, चिंताकुंता केशावुलू आणि शिवा अशी होती. त्यांना पशुवैद्यकीय डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना तेलंगाणामधील शादनगर दंडाधिकाऱ्यांनी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. या प्रकरणातील पीडितेचे नाव बदलून 'जस्टिस फॉर दिशा' अशा सूचना सायबराबादचे आयुक्त सज्जनार यांनी दिली होती.

 

हैदराबादमध्ये २७ नोव्हेंबरला महिला डॉक्टरसोबत सामूहिक करण्यात आला. यानंतर पीडित महिलेला जाळून मारण्यात आले. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट पसरली होती, तसेच पीडित महिलेला लवकर न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरु लागली होती. २७ नोव्हेंबरला ४ आरोपींनी पहिले पीडित महिलेची गाडी पंक्चर केली आणि मदत करण्याचे नाटक केले. यानंतर चारही आरोपी तिला टोल प्लाझाजवळच्या निर्जन स्थळी घेऊन गेले. याठिकाणी महिलेवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली.

@@AUTHORINFO_V1@@