घडलेला प्रकार अयोग्य ; राजकीय नेते आणि कायदेतज्ञांचे मत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


मुंबई : हैदराबाद बलात्कार एन्काउंटर प्रकरणी देशभरातील सर्वसामान्यांकडून स्वागत होत आहे. असे असताना अनेक कायदेतज्ज्ञ आणि राजकारणी मंडळींकडून हा प्रकार देशाच्या कायदा सुव्यवस्थेला घटक ठरू शकतो, अशाप्रकारची प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकरणाबद्दल सखोल चौकशीची मागणीदेखील केली आहे तर काहींनी सरकारने आणि न्यायालयाने पोलिसांच्या पाठीशी राहावे अशी प्रतिक्रियादेखील व्यक्त केली होती.

 

जाणून घेऊया काय आहेत कोणाच्या काय आहेत प्रतिक्रिया?

 

- "सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार देशात झालेल्या प्रत्येक एन्काउंटरची चौकशी व्हायला हवी." अशी मागणी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.

 

- "न्यायिक व्यवस्थेबाहेरील झालेला हा एन्काउंटरचा प्रकार स्वीकारण्याजोगा नाही. या प्रकरणातील अधिक माहिती मिळणे गरजेचे आहे. जर आरोपींच्या हातात हत्यारे असतील तर पोलीसांनी केलेली कारवाई योग्य ठरू शकते. मात्र, जो पर्यंत संपूर्ण सत्य आपल्याला माहीत पडत नाही, तो पर्यंत याचा निषेध करणे योग्य ठरणार नाही. मात्र, कायद्याने चालणाऱ्या या समाजात अशा प्रकारच्या बेकायदेशीर प्रकारांना योग्य असल्याचे म्हटले जाऊ शकत नाही." असे ट्विट काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी केले आहे.

 

- राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सांगितले की, "बलात्कारानंतर खून करणाऱ्या त्या आरोपींचा अंत झाल्यामुळे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला आनंद झाला आहे. हेच सर्वांना हवे होते. मात्र, ही प्रक्रिया न्यायिक पद्धतीनुसार व्हायला हवी होती. या आरोपींना शिक्षा योग्य पद्धतीने व्हायला हवी होती. या आरोपींना फाशी व्हावी अशीच सर्वांची मागणी होती आणि हे पोलीस सर्वात चांगले न्यायाधीश सिद्ध झाले आहेत. कोणत्या परिस्थितीत हे एन्काउंटर झाले याची आपल्याला माहिती नाही."

 

- "हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेला झटपट न्याय मिळाला, या भावनेतून सर्वसामान्य नागरिक हैदराबाद एन्काऊंटरच्या घटनेमुळे खूश झाला आहे. सर्वसामान्य नागरिक म्हणून माझीही हीच भावना आहे. परंतु, कायद्याचा अभ्यासक म्हणून मी या घटनेचे समर्थन करणार नाही. असे मत राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@