'या' झटपट न्यायाची कुठे प्रशंसा तर कुठे चौकशीची मागणी !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0

 


नवी दिल्ली : महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिला जाळून मारल्याप्रकरणी ताब्यात असलेले चार नराधम पोलीस एन्काउंटरमध्ये मारले गेले आहेत. पळून जाण्याचा प्रयत्ना त असताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते ठार झाले. गेले १० दिवस चालेल्या या प्रकरणामध्ये झटपट न्याय दिल्याची भावना जनमाणसातून होत आहे. देशभरातून या एन्काउंटरचे समर्थन केले जात आहे. तर बहुतांश जणांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी होती असेदेखील मत व्यक्त केले आहे.

 
 
 

नागरिकांकडून हैदराबाद पोलिंसांवर फुलांचा वर्षाव केला गेला. तसेच, पीडितेला न्याय मिळाल्याची सामान्यांची प्रतिक्रिया आहे. हैदराबादचे आयपीएस अधिकारी व्ही. सी. सज्जनार यांची या एन्काउंटरमध्ये प्रमुख भूमिका होती. यांचेदेखील कौतुक सोशल मीडियावर केले जात आहे.

 
 
 
विशेष म्हणजे, याआधी २००८मधील वारंगल अ‍ॅसिड हल्ला प्रकरणातील आरोपींचाही एन्काउंटरमध्येही सज्जनार यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.
@@AUTHORINFO_V1@@