... म्हणून आम्ही गोळ्या झाडल्या ; पोलिसांची पत्रकार परिषद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0

 


नवी दिल्ली : हैदराबादमधील पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकारांतील चारही आरोपींचा शुक्रवारी पहाटे एन्काऊंटर करण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, "आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे त्यांच्यावर गोळी चालवण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. ही संपूर्ण घटना पहाटे ३ ते ६ दरम्यान झाली." पुढे त्यांनी सांगितले, "चार्जशीट दाखल केल्यानंतर आम्ही चारही आरोपींना घटनास्थळावर घेऊन गेलो. तिथे 'सीन ऑफ क्राइम' (रिक्रिएशन)चा तपास घेत होतो. याचदरम्यान, एका आरोपीने आमच्याकडील बंदूक हिसकावून घेतली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या." पोलिस कमिश्नर सज्जनार यांनी पत्रकार परिषदे घेऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.

 

पोलिस कमिश्नर वीसी सज्जनर म्हणाले की, "पोलिसांनी आरोपींना सरेंडर करण्यास सांगितले होते. पण, आरोपींनी आमच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून आम्हीही गोळ्या झाडण्यास सुरुवात केली आणि त्यात चारही आरोपींचा खात्मा झाला. या चकमकित आमचे दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे."

 

कसा झाला संपूर्ण घटनाक्रम?

 

सज्जनार म्हणाले की, "रिमांडच्या चौथ्या दिवशी आम्ही त्यांना बाहेर घेऊन आलो, त्यांनी आम्हाला पुरावे दिले. त्यांनी सांगितलेले पुरावे शोधण्यासाठी आम्ही घटनास्थळावर आलो होतो, यावेळी आरोपींनी पोलिस कर्मचाऱ्याच्या दोन बंदुका घेऊन फायरिंग केली. त्यांच्या फायरिंगला प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिसांनी फायरिंग सुरू केली. या चकमकीत चारही आरोपींचा खात्मा झाला तर एक एसआय आणि कॉन्स्टेबल जखमी झाले."

 

काय घडले होते 'त्या' रात्री?

 

२७ नोव्हेंबर २०१९ रोजी २६ वर्षीय महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. शमशाबाद येथे तिला जाळण्यात आले. सायबराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ४ आरोपींनी सुरुवातीला तिच्या स्कूटरचे मागचे चाक पंक्चर केले होते. यानंतर मदत करण्याचे ढोंग करून तिला निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. या दरम्यान पीडितेचा गुदमरून मृत्यू झाला आणि नराधमांनी तिचा मृतदेह त्याच ठिकाणी जाळला.

@@AUTHORINFO_V1@@